पारगाव- खंडाळा अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी
दोन लाख रुपये मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई दि : १६
सातारा-पुणे मार्गावरील पारगाव-खंडाळा येथे आज कंटेनरच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आठ प्रवाशांच्या वारसांना प्रत्येकी २ लाख रुपये मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
आज दुपारी पारगाव-खंडाळा येथे कंटेनर उलटून रस्त्यावर एसटीची वाट पाहत असलेले आठ प्रवासी या कंटेनरखाली चिरडले गेले होते. या दुर्घटनेची माहिती कळताच मुख्यमंत्र्यांनी पोलीस यंत्रणेकडून त्वरित माहिती घेतली. तसेच सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांना तातडीने अपघातस्थळी जाण्यास व तेथील परिस्थिती हाताळण्यास सांगितले.याशिवाय त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील संबधितांना योग्य ती मदत लगेच मिळेल याची खातरजमा करण्याचे निर्देश दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा