देश निरोगी राहण्यासाठी स्वच्छ भारत अभियानात
सर्वांनी योगदान द्यावे : मुख्यमंत्री
मुंबई,
दि.15: स्वच्छ भारत अभियानात शालेय विद्यार्थ्यांचा
सहभाग महत्त्वाचा असून जोपर्यंत स्वच्छता हा आपल्या दैनंदिन कामाचा भाग होणार नाही,
तोपर्यंत आपला देश, आपले राज्य व आपले शहर स्वच्छ होणार नाही. त्यामुळे देशाबरोबरच
आपल्या राज्यालाही निरोगी करण्यासाठी स्वच्छ भारत अभियानात सर्वांनी योगदान
द्यावे,असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
स्वच्छ
भारत अभियानांतर्गत आज अनुयोग विद्यालय,
जवाहर नगर, खार (पूर्व) येथे स्वच्छता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी
मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी खासदार पूनम महाजन, आमदार ॲड .आशिष
शेलार, नगरसेवक महेश पारकर, सिनेअभिनेते मधुर भंडारकर, कपिल शर्मा उपस्थित होते.
खासदार
पूनम महाजन म्हणाल्या, स्वच्छता अभियानात प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा
असून प्रत्येक नागरिकाने आपले घर, आपला परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री
श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत यावेळी स्वच्छता दिंडी काढण्यात आली. यात खासदार
पूनम महाजन, नगरसेवक महेश पारकर यांच्यासह शालेय विद्यार्थी, स्थानिक नागरिक आदींनी
सहभाग घेतला.
.jpg)
.jpg)
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा