लॉर्ड लुंबा फाऊंडेशनच्या उपक्रमाला सर्वोतोपरी सहाय्य : मुख्यमंत्री
मुंबई,
दि. 15 : लॉर्ड लुंबा फाऊंडेशनच्या वतीने समाजातील गरीब विधवांच्या सक्षमीकरणाचा
उपक्रम हाती घेतला आहे. समाजाच्या उन्नतीसाठी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. या
उपक्रमाला राज्य शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी दिले.
इंग्लंड
येथील लॉर्ड लुंबा फाऊंडेशनच्या प्रतिनिधी मंडळाने आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची
भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी
इंग्लंडच्या हाऊस ऑफ लॉर्डस्चे खासदार लॉर्ड लुंबा, खासदार लॉर्ड ढोलकीया, मुंबईतील
ब्रिटीश उपउच्चायुक्त कुमार अय्यर, गटेनबर्ग कम्युनिकेशनचे संचालक पुनीत खुनगर,
डिपार्टमेंट फॉर बिझनेस इनोव्हेशन ॲण्ड स्कीलचे डॉ. विन्स केबल आदी उपस्थित होते.
जगभरातील
गरीब विधवांच्या सक्षमीकरणासाठी लॉर्ड लुंबा फाऊंडेशनच्या निधी गोळा करण्यात येत
आहे. यासाठी भारतात मुंबई ते बंगलुरू पदयात्रा करण्यात येणार आहे. या पदयात्रेची
सुरवात गेट वे ऑफ इंडिया येथून जानेवारी 2015 मध्ये करण्यात येणार आहे. या
पदयात्रेच्या शुभारंभाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहावे, अशी विनंतीही यावेळी
शिष्टमंडळाने केली.
फाऊंडेशनचे
कार्य अत्यंत चांगले आहे. तसेच फाऊंडेशनने हाती घेतलेला उपक्रम स्पृहणीय आहे, या
उपक्रमासाठी राज्य शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करेल, असे सांगून
मुख्यमंत्र्यांनी पदयात्रेच्या शुभारंभाला उपस्थित राहण्याचे मान्य केले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा