मंगळवार, १५ मे, २०१२



रमाई घरकुल योजनेसाठी जमीन अधीग्रहीत करावी
-        मुख्यमंत्री
मुंबई, दि. 15 : राज्यातील दारिद्र्यरेषेखालील मागासवर्गीयबांधव घरकुलापासून वंचित राहू नये यासाठी रमाई घरकुल योजनेंतर्गंत जमीन अधिग्रहीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे दिले.
        आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनात यासंदर्भात झालेल्या बैठकीस सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, राज्यमंत्री सचिन अहीर, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव के. पी. बक्षी, वित्त् विभागाचे सचिव श्रीकांत देशपांडे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, ग्रामविकास विभागाचे सचिव सुधीर ठाकरे, नगरविकास विभागाचे सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदींसह वरीष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
        मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, राज्यातील दारिद्र्यरेषेखालील मागासवर्गीय बांधवांना रमाई घरकुल योजनेंतर्गत घरे बांधता यावी यासाठी सामाजिक न्याय विभागाने जमिन अधिग्रहीत करून घ्यावी. जागेअभावी मागासवर्गीय बांधव घरकुलापासून वंचित राहता कामा नये. शहरी भागात जागा उपलब्ध होण्यासाठी म्हाडाच्या सहकार्याने  योजना सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा