सोमवार, १४ मे, २०१२


जागा मिळणार नसल्याच्या बातम्या विपर्यास्त
इंदू मिलची जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या
स्मारकाला हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरु -   मुख्यमंत्री        
मुंबई, दि.14 : इंदू मिलची जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला मिळण्यात अडचणी येत आहेत, अशा स्वरुपाच्या बातम्या विपर्यास्त असून या ठिकाणी डॉ.बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी राज्य शासन कटिबध्द आहेत. तसेच ही जागा राज्य शासनाच्या ताब्यात देण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरु आहे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज स्पष्ट केले.
        गेल्या एक-दोन दिवसांपासून इंदू मिलची जागा डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकाला देण्यासंदर्भात वस्त्रोद्योग महामंडळ तसेच केंद्रीय वस्त्रोद्योग खाते टाळाटाळ करीत आहेत, अशा स्वरुपाच्या प्रसिध्द झालेल्या बातम्या विपर्यास्त असून मी स्वत: केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांशी बोललो आहे. ही जागा हस्तांतरीत करण्यासंदर्भात कायदेशीर प्रक्रिया व्यवस्थितरित्या पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे कोणीही केवळ भावनात्मक प्रश्न निर्माण करु नये असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, एनटीसी ही केंद्राची व्यावसायिक मालमत्ता आहे त्यामुळे हस्तांतरणापूर्वी या जमिनीचा मोबदला, पर्यावरण विषयक मंजूरी, या जागेचे आरक्षण विशेष बाब म्हणून बदलून घेणे तसेच टीडीआर वगैरे सारख्या विषयांवर विशिष्ट कार्यपध्दती अवलंबून निर्णय घ्यावे लागतील. ही प्रक्रिया सुरु असून केंद्र सरकारकडे राज्याने प्रस्ताव पाठवला आहे. त्याचप्रमाणे मुख्य सचिव सातत्याने याबाबतीत केंद्रातील संबंधितांशी चर्चा करीत आहेत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
                                        000000000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा