सिना
कोळेगांव धरणातून 20 द.घ.मी. पाणी
केवळ
पिण्यासाठी सोलापूरला देणार -मुख्यमंत्री
मुंबई,
दि.14 : सोलापूर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फार गंभीर बनलेला असून
सिना कोळेगाव धरणातून सोलापूर जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी 20 दशलक्ष
घनमीटर पाणी देण्यात यावे. हे पाणी सोडल्यानंतर शेतीसाठी वापरण्यात येऊ नये यासाठी
पाऊस पडेपर्यंत या भागातील लिफ्ट इंरिगेशनची विजेचे कनेक्शन बंद करावीत अशा सूचना
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिल्या.
या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.लक्ष्म्णराव ढोबळे,
जलसंपदा मंत्री रामराजे नाईकनिंबाळकर, वनमंत्री पतंगराव कदम, दुग्धविकास मंत्री
मधुकरराव चव्हाण, खासदार पद्मसिंह पाटील, आमदार राहुल मेटे, आमदार दिलीप माने व
इतर लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
परांडा शहराच्या पाणी पुरवठयावर कोणताही परिणाम होणार नाही.
तसेच सिना धरणातील पुनर्वसीत क्षेत्राला कोणतीही बाधा न आणता सोलापूरसाठी सोडण्यात
येईल. व हे पाणी फक्त पिण्यासाठीच वापरावे . शेतीसाठी वापरण्यात येऊ नये असे
सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील सर्व कोल्हापूर बंधाऱ्यात
पाणी असेल तर तेही पिण्यासाठी वापरण्यात यावे, भूम-परांडा, उत्तर व दक्षिण सोलापूर
तालुक्यात आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. या भागातील लोकांना कोणत्याही
परिस्थितीत प्रथम पिण्याचे पाणी दयावेच लागेल. आज सोलापूर जिल्ह्यात 235
टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा चालू आहे. सिना धरणातून हे पिण्यासाठी पाणी
सोडले तरी सोलापूर जिल्ह्यातील शेवटच्या काही भागात पाणी पोहचणार नाही हे निश्चित
आहे. त्यामुळे जेथे पाणी पोहचणार नाही तेथे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा
अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.
आज उपलब्ध असणारे पाणी लोकांना पिण्यासाठी किती दिवस पुरेल याचा
अधिकाऱ्यांनी अभ्यास करावा आणि त्याचे नीट नियोजन करावे. तसेच आजच्या बैठकीत ज्या
अटी ठरविण्यात आल्या आहेत, त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करावी. असे
मुख्यमंत्री शेवटी म्हणाले.
0000000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा