आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांची जन्मशताब्दी आणि आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने कोल्हापुरात शनिवारी आयोजित यशवंत सहकार सोहळ्याचे दीपप्रज्वलन करुन उद्घाटन करताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. शेजारी पालकमंत्री तथा सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, दुग्धविकासमंत्री मधुकरराव चव्हाण, गृहराज्यमंत्री सतेज पाटील. महापौर कादंबरी कवाळे, माजी खासदार कलाप्पाण्णा आवाडे, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे
सहकारातील शिस्तीसाठी प्रसंगी कटू
निर्णय
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे
प्रतिपादन
कोल्हापूर, दि. 12 - जागतिकीकरणाच्या नव्या
कालावधीत सहकार चळवऴीचे महत्व
आबाधित आहे. पण या चळवळीला
आता शिस्त लावण्याची गरज
असून त्यासाठी प्रसंगी कटू
निर्णय घ्यावे लागतील, असे प्रतिपादन
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी
आज येथे केले.
आधुनिक महाराष्ट्राचे
शिल्पकार स्वर्गीय यशवंराव चव्हाण
यांची जन्मशताब्दी आणि
आंतरराष्ट्रीय सहकार सोहळा निमित्ताने
आयोजित यशंवत सहकार सोहळा
आज येथे झाला. या सोहळ्याच्या
उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे
म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण बोलत होते. मार्केट
यार्डातील शाहू सांस्कृतिक मंदिर
येथे हा कार्यक्रम झाला.
यावेळी
व्यासपीठावर विधान परिषदेचे सभापती
शिवाजीराव देशमुख, विधान सभेचे
अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, सहकार, संसदीय कार्य
तथा पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, वने
आणि पुनर्वसन मंत्री डॉ.
पतंगराव कदम, महसूलमंत्री बाळासाहेब
थोरात, दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण, कामगार
मंत्री हसन मुश्रीफ, विधानसभेतील विरोधी
पक्षनेते एकनाथराव खडसे, सहकार राज्यमंत्री
प्रकाश सोळंके, गृहराज्यमंत्री सतेज
पाटील, कोल्हापूरच्या महापौर कादंबरी कवाळे
आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री
चव्हाण म्हणाले, सहकारातील चळवळीला
शंभर वर्षापूर्वीचा इतिहास
आहेृ 1904 मध्ये अस्तित्वात आलेल्या सहकार
कायद्यात 1912 आणि 1925 मध्ये बदल झाले.
महाराष्ट्रात 1960 ते 1970 या दशकात सहकार
चळवळीने मूळ धरले. स्वर्गीय
यशवंतराव चव्हाण यांनी सहकार
चळवळीला बळ दिल्यामुळेच हे शक्य
झाले. सहकारी चळवळीने राजकीय
नेतृत्व विकसीत केले आहेत, असे
सांगून मुख्यमंत्री म्हणाले, भारतीय
राज्यघटनेतील 97 व्या कलमातील
दुरुस्तीमुळे जानेवारी 2013 पर्यंत सहकार
कायद्यात बदल करणे अपेक्षित
आहे. त्याचबरोबर सहकारात येत्या
20- 25 वर्षात
काय बदल अपेक्षित आहेत.
त्यानुसार आराखडा करावा लागेल.
त्यासाठी सहकारातील तज्ञ व्यक्तींची
समिती नेमली जाईल'
मुख्यमंत्री म्हणाले, 'सहकार
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा
आहे. मात्र आज सहकारात
काही अपप्रवृत्ती आल्या
आहेत. त्याला आळा घालण्यासाठी
राज्य शासनाने उपाययोजना आखल्या
आहेत. पण सहकाराला आता
आर्थिक शिस्त लावण्याची आवश्यकता
आहे. त्यासाठी प्रचंड कटू
निर्णयही घ्यावे लागतील. सहकार
चळवळीने अनेक क्षेत्रात विधायक
काम केले आहे. यापुढे
सहकाराने कमोडीटी एक्सचेंज, सेवा क्षेत्र
आदी क्षेत्रातही उतरायला
हवे.'
विधानसभा अध्यक्ष दिलीप
वळसे-पाटील म्हणाले, 'सहकाराची चळवळ
शेतीशी निगडित आहे. त्यामुळे
सहकार चळवळीने केलेले कार्य
शेतकऱ्यांला आणि शेतीला बळकटी
देणारे आहे. पण सहकार
चळवळ केवळ शेतीशी निगडीत
राहिलेला नाही तो बँकिंग, मार्केटिग, उत्पादन
प्रक्रिया, उद्योगातही आहे. सहकाराने आता
सेवा उद्योगातही आपले पाऊल
टाकायला हवे.'
वनमंत्री डॉ.
पतंगराव कदम म्हणाले, 'देशात केवळ
महाराष्ट्रातच सहकार चळवळ रुजली.
स्व. यशवंतराव चव्हाण यांनी
सहकार चळवळीला प्रोत्साहन दिले.
त्यामुळेच महाराष्ट्रात ही चळवळ
रुजली सहकार चळवळीने शेतकरी, कष्टकरी
सामान्य माणूस यांना उद्योगपती
केले. पण आता सहकार
चळवळीतील कार्यकर्ते आणि राज्य
शासन यांनी आत्म परिक्षण
करण्याची आवश्यकता आहे.'
विधानसभेतील
विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे
म्हणले, 'सहकार चळवळीच्या माध्यमातून राज्यात
अतिशय चांगली कामे झाली.
सहकारातील संस्था वाढ झाली.
उलाढाल वाढली. पण आता
सहकारी चळवळीत काही अनिष्ट
प्रथा आल्या आहेत. सहकरातील
या अनिष्ट प्रथा वेळीच
ठेचून टाकण्याची गरज आहे.
त्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल
करण्याची आवश्यकता आहे.'
महसूलमंत्री
बाळासाहेब थोरात म्हणाले, 'स्वर्गीय यशवंतराव
चव्हाण यांनी सहकाराच्या माध्यमातून
सहकारी साखर कारखानदारी, सूतगिरणी, दूध संघ, सहकारी
बँकाची उभारणी झाली. या संस्थानी
राज्यात आर्थिक, सामाजिक आणि
शैक्षणिक क्रांती घडवून आणली.
या सर्व संस्थांच्या उभारणीत
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या
विचारांची बीजे आहेत. सहकार
चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागात
आर्थिक, सामाजिक क्रांती झाली.'
सहकारमंत्री हर्षवर्धन
पाटील यांनी प्रास्ताविकात, 'यशवंतराव चव्हाण
यांनी सहकाराच्या माध्यमातून राज्यात
कृषी आणि औद्यागिकीकरणाच्या विकासाची
मुहुर्तमेढ रोवली. सहकाराच्या माध्यमातून
राज्यात आर्थिक आणि सामाजिक
विकास झाला. सहकाराबाबत विचार
व्हावा, आधुनिक काळात सहकार चळवळ
आबाधित राहावी त्याबाबत विचारमंथन
व्हावे यासाठी हा सोहळा
आयोजित करण्यात आला आहे, असे
सांगितले.
यावेळी खासदार
सदाशिवराव मंडलिक, आमदार सर्वश्री
सा. रे. पाटील, के. पी.
पाटील, सुरेश हाळवणकर, चंद्रदिप नरके, डॉ.
सुजित मिणचेकर, बाळासाहेब पाटील, महादेवराव
महाडिक, उल्हास पवार, जयंत पाटील, सहकार
विभागाचे सचिव राजगोपाल देवरा, सहकार
आयुक्त मधुकर चौधरी, माजी खासदार
कल्लाप्पाआण्णा आवाडे, श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ
नेते प्रा. एन डी.
पाटील, शिवाजीराव गिरधर पाटील आदी
पदाधिकारी व सहकार विभागाचे
अधिकारी उपस्थित होते.
000000000
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार
स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांची जन्मशताब्दी
आणि आंतरराष्ट्रीय सहकार
वर्षाच्या निमित्ताने कोल्हापुरात शनिवारी
आयोजित यशवंत सहकार सोहळ्यात
बोलताना मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण समवेत गृहराज्यमंत्री सतेज
पाटील, सहकार राज्यमंत्री प्रकाश
सोळंके, कामगार मंत्री, हसन मुश्रीफ, मसहूलमंत्री
बाळासाहेब थोरात, वनमंत्री डॉ.
पतंगराव कदम, विधानसभा अध्यक्ष
दिलीप वळसे-पाटील, विधान परिषद
सभापती शिवाजीराव देशमुख, पालकमंत्री तथा
सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, विरोधी
पक्षनेते एकनाथराव खडसे, आमदार सा.
रे. पाटील, दुग्धविकासमंत्री मधुकरराव
चव्हाण, ज्येष्ठ नेते एन डी.
पाटील आदी.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा