खनिज विकास निधीपैकी 50 टक्के रक्कम संबंधित
ग्रामपंचायत आणि नगरपालिकांना मिळणार -
मुख्यमंत्री
मुंबई, दि. : खाणींमुळे प्राप्त होणाऱ्या स्वामित्वधनामधुन खनिज
विकास निधीला प्राप्त होणाऱ्या निधीपैकी 50 टक्के रक्कम संबंधित ग्रामपंचायत किंवा
स्थानिक स्वराज्य संस्था यांना देण्यात यावी व ही रक्कम रस्ते, पर्यावरण संतुलन,
जलसंधारण, आरोग्य या कामासाठी खर्च करण्यात यावी, असा निर्णय मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे घेतला.
खनिज विकास निधीचा वापर व वाटप यासाठी गठीत केलेल्या राज्य
स्तरीय सल्लागार समितीची बैठक श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात
आयोजित करण्यात आली होती. यावेळी नागपूरचे
पालकमंत्री शिवाजीराव मोघे, यवतमाळचे पालकमंत्री नितीन राऊत भंडारा जिल्ह्याचे
पालकमंत्री तथा राज्यमंत्री रणजित कांबळे , लोकसभा सदस्य हंसराज अहिर, महसुल विभागाचे
प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय, उद्योग विभागाचे प्रधान सचिव के. शिवाजी आदी
मान्यवर उपस्थित होते.
तसेच उर्वरित 50 टक्के निधी
खाणीच्या बाह्य परिघापासून 20 कि.मी.
क्षेत्रापर्यंत फक्त खाणमालवाहतुकीमुळे खराब होणाऱ्या रस्ते विकासासाठी वापरण्यात
यावेत. असाही निर्णय यावेळी घेण्यात आला.
------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा