शनिवार, ८ ऑक्टोबर, २०११

विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम



नागपूर जिल्ह्यातील विकास कामांना गती देणार   मुख्यमंत्री                                
      नागपूरदि.7 : नागपूर जिल्हयाच्या विकास कामाला अधिक गतिमान करण्यासाठी येत्या 15 आणि 16 ऑक्टोंबर रोजी नागपुरात येईन अशी माहिती मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
            दीक्षाभूमी येथील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या समारोहासाठी काल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नागपुरात आगमन झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्याच्या रामगिरी बंगल्यावर आयोजित विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित असलेल्या मान्यवरांना आपटयाची पाने देवून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
            यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री शिवाजीराव मोघे, रोजगार हमी योजना मंत्री डॉ.नितीन राऊत, वित्त व नियोजन राज्यमंत्री  राजेंद्र मुळक प्रामुख्याने उपस्थित होते.
            लोकप्रतिनिधी व युवकांनी विचाराची आदान प्रदान करुन प्रश्न मिटवावे व कार्य करावे असा सल्ला देवून मुख्यमंत्र्यांनी   नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
            यावेळी पालकमंत्री  शिवाजीराव मोघे यांनी आपले विचार व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, माजी मंत्री हरिभाऊ नाईक, माजी मंत्री मधुकरराव किंमतकर, आमदार एस.क्यू. जमा, माजी आमदार यादवराव देवगडे, माजी आमदार शौकत कुरेशी, माजी खासदार गेव्ह आवारी, नागपूर शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, नागपुर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजय पाटील, नगरसेविका श्रीमती प्रगती पाटील, नागपुर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर मेघे, श्रीमती रुपा कुळकर्णी, रामप्रसाद खोब्रागडे, शेख हुसेन, कृष्णकुमार पांडे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मारोतराव कुंभलकर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा श्रीमती प्रभा ओझा, विभागीय आयुक्त प्रवीण दराडे, पोलीस आयुक्त डॉ. अंकुश धनविजय, जिल्हाधिकारी सौरभ राव व अन्य मान्यवर उपस्थित होते.                                                          ******











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा