सोमवार, १० ऑक्टोबर, २०११

विविध वास्तूंचा लोकार्पण सोहळा


निळवंडे प्रकल्पासाठी निधीची कमतरता
 पडू दिली जाणार नाही - मुख्यमंत्री
                     
        शिर्डी, दि. 10 : अहमदनगर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या निळवंडे प्रकल्पातून सिंचनाची सोय होण्यासाठी या प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी लागणाऱ्या निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
            राहाता नगर परिषद, जिल्हा परिषद, आरोग्य आणि पशुसंवर्धन, परिवहन मंडळ यांच्यावतीने विकसित करण्यात आलेल्या विविध वास्तूंचा लोकार्पण सोहळा आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ आज झाला याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते.
            समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण बाळासाहेब विखे-पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृह ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे-पाटील, मदार सर्वश्री भाऊसाहेब कांबळे, डॉ.सुधी तांबे, शिर्डी येथील श्रीसाईबाबा संस्थानचे अध्यक्ष जयंत ससाणे, जिल्हाधिकारी संजीवकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल गुप्ता, पोली धीक्षक कृष्णप्रकाश आदी मान्यवर उपस्थित होते.
            मुख्यमंत्री म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर राहाता येथे विकासाची विविध कामे हाती घेण्यात आली असून विकासाची ही मालिका पुढे चालूच राहाणार आहे. विकास कामांची स्पर्धा प्रत्येक जिल्हयात होण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील विकास कामाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडविण्यावर प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. खंडकरी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात येत असून मी वाटपाची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. शिर्डी या परिसराचा जलद विकास होण्यासाठी दळणवळणाची साधने अत्यंत महत्वाची आहेत. शिर्डी विमानतळाचे काम विमानतळ प्राधिकरणाच्या मदतीने लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. स्वर्णजयंती राजस्व अभियानांतर्गत संपूर्ण राज्यातील जमिनीची मोजणी करण्याचा महत्वपूर्ण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जमिनीचे फेरफार, सातबारा संगणकीकरणावर देण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
            राज्यात ऊस कापूस,दाळ पिकांचे शेतकऱ्यांनी क्रांतीकारक उत्पादन केले आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे अनेक निर्णय घेण्यात आले असून पणन विकासाचेही काम उत्कृष्टपणे राज्यात चालू आहे.
            अध्यक्षीय भाषणात बाळासाहेब विखे-पाटील यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विकास कामांना गती मिळाली असल्यामुळे नवा महाराष्ट्र घडत आहे. उद्योगाच्या माध्यमातू लहान शहराचा विकास होण्याची आवश्यकता त्यांनी  यावेळी  प्रतिपादन केली.
            कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, नगर मनमाड रस्त्याचे बीओटी तत्वावर घेऊन या कामाला गती देण्याची आवश्यकता आहे.
            महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, राजस्व अभियान राबवून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात आले असून उपग्रहाद्वारे शेतकऱ्याच्या जमिनी मोजण्यात येणार आहेत. संगणकावर शेतऱ्यांना सातबारा वितरणाचे काम देखील हाती घेण्यात आले आहे.
            प्रारंभी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते राहाता येथील ग्रामीण रुग्णालयाची विस्तारीत इमारत, नवीन बस स्थानक, पंचायत समिती येथील पदाधिकारी,अधिकारी कर्मचाऱ्यांची 22 निवासस्थने, पशुसंवर्धन विभागाच्यावतीने बांधण्यात आलेल्या तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय इमारती, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने बांधा वापरा हस्तांतरीत करा या तत्वावर बांधण्यात आलेले श्रीविरभद्र व्यापारी संकुल, राहाता नगर परिषदेने विकसित केलेले छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल यांचे उद्‌घाटन झाले. 
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा