सोमवार, १० ऑक्टोबर, २०११

तहसिल कार्यालयाच्या नवीन वास्तुचा लोकार्पण सोहळा


सिन्नरच्या एसईझेडचा प्रश्न सोडविण्यासाठी
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती - मुख्यमंत्री
       
            नाशिक, दि. १० : नाशिक जिल्हयातील सिन्नर येथे होऊ घातलेल्या विशेष आर्थिक क्षेत्राचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार. असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण यांनी  सिन्नर येथे आज केले. पर्यावरण पूरक अशा तहसिल कार्यालयाच्या नवीन वास्तुचा लोकार्पण सोहळा यावेळी  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. त्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
            शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला देवून हा प्रश्न सोडविला जाईल अशी  ग्वाही मुख्यमंत्र्यांनी  यावेळी  दिली. यावेळी  उद्योगमंत्री  नारायण राणे,  राज्याचे सार्वजनिक बांधकाम पर्यटन मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री . छगन  भुजबळ, महसू मंत्री  बाळासाहेब थोरात, कृषी पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, गृहराज्यमंत्री सतेज  पाटील, महसू राज्यमंत्री प्रकाश सोळंके, एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष सुधाकर परिचारक, आमदार सर्वश्री निर्मला गावीत, जयप्रकाश छाजेड, डॉ. सुधीर तांबे, जयवंत जाधव, साई बाबा संस्थानचे अध्यक्ष जयंत ससाणे, माणिकराव कोकाटे  यांची प्रामुख्याने उपस्थिती  होती.
            मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण पुढे  म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य शासन कटिबध्द असून आगामी काळात शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव दिला जाईल, नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. सिन्नर येथील महिला बचत गटांना आपला माल  विकण्यासाठी भांडार निर्माण करण्यात येईल. तसेच नवीन पोलीस ठाणे उभारण्यात येईल. सिन्नर येथे  १०० खाटांचे शासकीय रुग्णालय उभारण्यात येईल, असे आश्वासनही  मुख्यमंत्री श्री. चव्हाण  यांनी शेवटी  दिले.
            यावेळी  उदयोगमंत्री नारायण राणे, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, महसू मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची  भाषणे झालीत. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांचे हस्ते सिन्नर  येथील नवीन बस टर्मिनलचे उद्‌घाटन  झाले.
               
                                                          ००००००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा