वर्षा निवासस्थानी शासकीय परिचारिकांची सेवा
घेण्याबाबत मुख्यमंत्री सचिवालयाचा खुलासा
मुंबई, दि. 10 : मा. मुख्यमंत्री यांच्या सासुबाईंच्या सुश्रुषेसाठी शासकीय सेवेतील परिचारिका मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी पाठविण्यात आल्याबाबतची वृत्ते गेले दोन दिवस प्रसिद्ध होत आहेत. यांसदर्भात खुलासा करण्यात येतो की, वर्षा निवासस्थानी परिचारिका पाठविण्याबाबत मा. मुख्यमंत्री यांना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नव्हती. मुख्यमंत्री कार्यालयाकडुनही अशा प्रकारची कोणतीही विनंती करण्यात आली नव्हती. मा. मुख्यमंत्री चार दिवसांच्या सातारा, नागपूर व परभणीच्या शासकीय दौऱ्यावर गेलेले असताना परिचारिकांना वर्षा निवासस्थानी, मा. मुख्यमंत्र्यांच्या आजारी असलेल्या सासुबाईंची सुश्रुषा करण्यासाठी पाठविण्यात आले. अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मुंबईला परत येताच समजताच मा. मुख्यमंत्री यांनी ही व्यवस्था तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, परिचारिकांची व्यवस्था रद्द करण्याचा आदेशही जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांनी रविवारी सायंकाळीच काढला. त्यामुळेच आज सोमवारी परिचारिकांनी काढलेला मोर्चा अनावश्यक होता. त्याचबरोबर अशी विनंती कोणी केली होती, याची चौकशी करण्यात येत आहे.
000000
Public Relations Cell,
Chief Ministers Secretariat,
October 10, 2011
CM Secretariat clarifies about
Deputation of nurses at ‘Varsha’
Mumbai, October 10 - "There have been media reports about Government nurses being sent to Varsha on duty to attend to the Chief minister's mother-in-law on account of leave taken by regular nurse. It is hereby clarified that nurses were sent to Varsha without the Chief Minister's knowledge. There was no request from the CM's office. The Chief Minister was on a four day official tour of Satara, Nagpur and Parbhani when the nurses were deputed to attend to his ailing mother-in-law. As soon as he came to know about the arrangement after his return to Mumbai, he ordered it's cancellation. Accordingly, orders were issued by the Dean of the JJ hospital on Sunday itself canceling the deputation of nurses to official residence of the Chief Minister. The morcha today by the nurses union, hence, was unwarranted and unnecessary. Further enquiries are being made as to who had made such request."
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा