मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ' विकासपर्व ' पुस्तिकेचे प्रकाशन
परभणी, दि. 7 : परभणी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ' विकासपर्व ' या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज झाले.
यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके, आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावीत, सामान्य प्रशासन विभागाच्या राज्यमंत्री प्रा. फौजिया खान, खासदार गणेश दुधगावकर, आमदार सुरेश देशमुख, रामप्रसाद बोर्डीकर, संजय उर्फ बंडू जाधव, सिताराम घनदाट, मीराताई रेंगे पाटील, आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कुसूमताई देशमुख, विभागीय आयुक्त भास्कर मुंडे, जिल्हाधिकारी डॉ. शालीग्राम वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी संपादित केलेल्या ' विकासपर्व ' या पुस्तिकेत परभणी जिल्ह्याची ओळख, सुवर्ण जयंती महसूल अभियान, मानव विकास कार्यक्रम, जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना, अल्पसंख्याक विभागाच्या योजना, कृषी विभाग, मराठवाडा कृषी विद्यापीठाची वाटचाल, सिंचन, पशुसंवर्धन, शिक्षण, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन, सार्वजनिक आरोग्य, महिला विकास, महिला-बालक आरोग्य तपासणी महाशिबीर, पंचायतराज महिला प्रशिक्षण शिबीर, रस्ते विकास, शांततेची वाट, पोलीस प्रशासनाचा जनता दरबार, महालोक न्यायालय, होमगार्ड, उद्योग, आपत्ती व्यवस्थापन, संपूर्ण स्वच्छता अभियान, पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना आदी उपक्रमांचा आढावा घेण्यात आला आहे. पुस्तिकेसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक विजय नाहटा, संचालक प्रल्हाद जाधव, श्रध्दा बेलसरे-खारकर यांची प्रेरणा तर औरंगाबाद विभागाचे प्रभारी संचालक बी. एन. गवारी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच जिल्हाधिकारी डॉ. शालीग्राम वानखेडे व निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनीही पुस्तिकेसाठी मार्गदर्शन केले.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा