गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०११

पूर संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमीपूजन


कराडच्या प्रितीसंगमावरील पूरसंरक्षक भिंतीच्या
 कामाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
सातारा (जिमाका) 6:  स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कृष्णा-कोयना प्रिती संगमावरील समाधी स्थळाचे आणि अन्य धार्मिक ऐतिहासिक स्थळांचे पुरापासून संरक्षण होण्यासाठी कृष्णा नदीकाठी 40 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या पूर संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमीपूजन  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभास  प्रमुख पाहूणे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते. 
प्रीतीसंगमावरील या संरक्षक भिंतीच्या भूमीपूजन सोहळयास जिल्हयाचे पालकमंत्री रामराजे नाईक निंबाळकर, वनमंत्री डॉ. पंतगराव कदम, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा ज्योती जाधव, नगराध्यक्षा शारदाताई जाधव, आमदार विलासराव पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार प्रभाकर घार्गे, आमदार जयकुमार गोरे, आमदार विक्रमसिंह पाटणकर, माजी खासदार श्रीनिवास पाटील,  जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, महाराष्ट्‌र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक दिपक कंदी, मुख्य अभियंता शिवाजीराव उपासे आदी मान्यवर उपस्थित होते. 
कृष्णा कोयना प्रीती संगम परिसर एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावे या दृष्टीने पूरसंरक्षक भिंतीचे काम वाढविण्याबाबत पाटबंधारे विभागाने कार्यवाही करावी अशी सूचना करुन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, नव्या पूलापासून समाधीपयंर्त पुर संरक्षकभिंतीच्या कामाबरोबरच लोकांना पर्यटनाच्या दृष्टीनेही नवी व्यवस्था व्हावी. ही कामे अधिक दर्जेदार करण्याची सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी केली. 
तत्पूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळास भेट दिली.  स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस पुष्पचक्र अर्पण करुन त्यांनी अभिवादन केले.  तसेच या परिसराची आणि पूरसंरक्षक भिंतीच्या कामाची पाहणी केली.  या कार्यक्रमास महाराष्ट् कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र मोहिते, खलील अन्सारी ,कार्यकारी अभियंता महेश सुर्वे, श्री.सुर्यवंशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी बी. एस. प-हाड, निवासी उपजिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिाकारी, अधिकारी आणि नागरिक  उपस्थित होते.
00000









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा