गुरुवार, ४ डिसेंबर, २०१४

छ. शिवाजी महाराजांच्या स्मारकाला मंजुरी
मिळाल्याचा आनंद अवर्णनीय : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 4 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी  समुद्रातील भव्य स्मारकाला केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने मंजुरी दिली, ही बाब अवर्णनीय आनंद देणारी आहे. आता कमीत कमी वेळेत जागतिक आकर्षण ठरेल, असे अप्रतिम स्मारक आम्ही उभारु, अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
 या नियोजित स्मारकाला केंद्रीय पर्यावरण विभागाने परवानगी दिल्याची घोषणा केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्ली येथे केली. त्याबाबत बोलताना श्री. फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी  समुद्रातील भव्य स्मारकाचे प्रत्येकाचे स्वप्न साकार होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या स्मारकाच्या जागेची निश्चिती आधीच झालेली आहे. आता शिवछत्रपतींच्या सन्मानाला आणि पराक्रमाला साजेसे स्मारक उभारण्याची आमची जबाबदारी आम्ही निष्ठेने पार पाडू.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा