शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१३

जगज्जेतेपद कायम राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या
विश्वनाथन आनंदला शुभेच्छा
मुंबई, दि. 9 : आजपासून चेन्नई येथे सुरु झालेल्या जागतिक बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या जगज्जेता विश्वनाथन आनंद याला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. क्रीडारसिकांमध्ये प्रंचड उत्सुकता असलेली ही जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आजपासून सुरु झाली असून जगज्जेता आनंदची लढत जागतिक क्रमवारीत प्रथम असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन याच्याशी होत आहे.
          मुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, या स्पर्धेत आनंद आपला जगज्जेतेपदाचा मुकुट कायम राखील, याची मला खात्री आहे. अवघ्या 22 वर्षांच्या कार्लसनकडुन जोरदार टक्कर मिळणार असली तरी आनंदचा अनुभव या स्पर्धेत निर्णायक ठरेल. या स्पर्धेमुळे 1972 मध्ये झालेल्या फिशर-स्पास्की यांच्यातील लढतीच्या माझ्या आठवणी जागृत झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. या अजिंक्यपद स्पर्धेमुळे भारतामध्ये बुद्धीबळ खेळाला प्रोत्साहन व चालना मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
000000
CM Chavan wishes Vishwanathan Anand
for his success In World Chess Championship

Mumbai, Nov. 9 : Chief Minister Prithviraj Chavan has given best wishes to World Chess Champion Vishwanathan  Anand  for success in the World Chess Championship against the challenger, current World no. 1 Magnus Carlsen of Norway. The first game of this much awaited world championship started today at Chennai.
        
  Mr. Chavan said, I am confident that Anand will retain his crown. Though Anand faces a strong challenge from the 22-year-old Norwegian Carslen, his experience would be a decisive factor in the championship. The excitement of the world championship clash reminds me of the famous Fischer-Spassky clash in 1972. I am sure the match will give boost to chess in India, Mr. Chavan added.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा