मराठवाड्यातील दुष्काळाची
पाहणी करणार -
मुख्यमंत्री
मुंबई : दि.
10- मराठवाड्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जायकवाडी परिसर, बीड, जालना, उस्मानाबाद येथे जावून मी येत्या काही दिवसात दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे सांगितले.
मराठवाडयातील आमदार सर्वश्री कल्याणराव काळे, अब्दुल सत्तार, धनंजय मुंढे, बदामराव पंडीत, प्रशांत बम, संतोष सांबरे, सुरेश जेथलिया, ज्ञानराज चौगुले, अमरसिंह पंडित यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
दुष्काळग्रस्त भागातील टंचाई जाहीर केलेल्या गांवांतील धरणांमधील पाण्यासंदर्भात आपत्कालीन आराखडा त्वरीत तयार करण्यात यावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, नरेगा अंतर्गत पाझर तलाव बळकटीकरण, शेततळी, सिमेंट बधारे, नाल्यांची कामे मोठया प्रमाणावर हाती घेण्यात यावी, प्रत्येक तालुक्यात वैरण विकास कार्यक्रम अंमलात यावा. दुष्काळी भागाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर याकरीता करण्यात येणाऱ्या उपाय योजनांसंदर्भात संबंधीत विभागांच्या अधिका-यांशी चर्चा करणार आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा