शनिवार, ३१ मार्च, २०१२



पर्यावरण संरक्षणाविषयी ब्रिटिश तज्ञांचे
मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण
मुंबई, दि. 31 मार्च : ब्रिटनमध्ये पर्यावरण, निसर्ग व वन्यप्राणी संरक्षणाबाबत महत्वाचे कार्य व संशोधन करणाऱ्या वेल्स एन्व्हरॉनमेंट रिसर्च हब या स्वयंसेवी संस्थेचे संचालक डॉ. शॉन रसेल यांनी आपल्या कामाचे सादरीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर केले. आपण ब्रिटनमध्ये केलेल्या कामाच्या धर्तीवर महाराष्ट्रात, विशेषत: पश्चिम घाट (सह्याद्री) परिसरात संशोधन करण्याची इच्छाही त्यांनी प्रदर्शित केली.
माजी मंत्री श्री. रोहिदास पाटील यांच्या पुढाकाराने या सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ब्रिटनमधील पर्यावरणविषयक लेखक व शास्त्रज्ञ डॉ. मार्क एवरार्द, वाईल्डलाईफ ॲण्ड वुई प्रोटेक्शन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवाजी चव्हाण, अध्यक्ष दिव्यांगसिंह चव्हाण. माजी मंत्री श्री. रोहिदास पाटील उपस्थित होते.
वाढत्या नागरीकरणामुळे निसर्ग व पर्यावरणाचा झपाट्याने ऱ्हास होत आहे. अनेक प्रकल्पांमुळेही नैसर्गिक समतोल ढासळतो आहे. ही प्रक्रिया संपुर्ण जगात चालु आहे. यामुळे वेळीच सावध होऊन विकासाचे प्रकल्प व पर्यावरणाचे संरक्षण यांचा समतोल गाठला जाणे आवश्यक असल्याचे मत डॉ. शॉन यांनी सादरीकरणादरम्यान मांडले.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा