सोमवार, १३ फेब्रुवारी, २०१२


आज कविवर्य ग्रेस यांना
साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान होणार

नवी दिल्ली :  महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी, साहित्यिक कविवर्य ग्रेस उपाख्य माणिक गोडघाटे यांना त्यांच्या वाऱ्याने हलते रान या साहित्यकृतीसाठी  मंगळवारी 14 फेब्रुवारीला साहित्य अकादमी 2011 चा पुरस्कार प्रदान होणार आहे.
   येथील कमानी सभागृहात सायंकाळी एका शानदार सोहळयात त्यांना  पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी  प्रख्यात हिंदी समालोचक नामवर सिंह, प्रमुख अतिथी  सुमती शिवमोहन  हे असणार आहेत.
   कविवर्य ग्रेस यांच्या वाऱ्याने हलते रानया सुप्रसिद्ध कवितेच्या ओळी आहेत. याच शिर्षकाखाली त्यांनी केलेल्या ललित लेखनासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. उद्या मंगळवारी  ग्रेस यांच्यासह  विविध 21 भाषेतील साहित्यिकांचा या मानाच्या पुरस्काराने सत्कार होणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रूपये रोख, स्मृतीचिन्ह शाल असे  आहे.
00000
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा