राज्यातील 8 शहरांतील 658 कोटी रुपयांच्या
नवीन प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांची मान्यता
मुंबई दि. 13 ऑक्टोबर : राज्यातील सहा महानगरपालिका आणि दोन नगरपालिकांच्या एकूण 658 कोटी रुपये खर्चाच्या आठ विकास प्रकल्पांना आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्यता दिली. या प्रकल्पामध्ये राज्य शासनाचा निम्मा हिस्सा 419 कोटी 33 लाख रुपयांचा असून त्यापैकी चालू वर्षामध्ये 25 टक्क्यांचा पहिला हप्ता म्हणून 104 कोटी 83 लाख रुपये वितरित करण्यात येणार आहेत.
हे सर्व प्रकल्प महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातंर्गत पूर्ण करण्यात येणार आहेत. आज मंजूर करण्यात आलेले प्रकल्प, त्यांची किंमत, शासनाचा हिस्सा आणि चालू वर्षी वितरित करण्यात येणारा निधी पुढील प्रमाणे-
1) कोल्हापूर महानगरपालिकेचा पर्जन्य जलवाहिनी प्रकल्प- किंमत 75 कोटी 58 लाख रुपये, राज्य शासनाचा हिस्सा 37 कोटी 79 लाख, चालू वर्षी वितरित करावायाचा निधी- 9 कोटी 45 लाख.
2) सोलापूर महानगरपालिकेचा रस्ते विकास प्रकल्प- किंमत 187 कोटी 77 लाख रुपये, राज्य शासनाचा हिस्सा 93 कोटी 88 लाख, चालू वर्षी वितरित करावायाचा निधी- 23 कोटी 47 लाख.
3) अमरावती महानगरपालिकेचा रस्ते व नालेविकास प्रकल्प- किंमत 60 कोटी 95 लाख रुपये, राज्य शासनाचा हिस्सा 30 कोटी 48 लाख, चालू वर्षी वितरित करावायाचा निधी- 7 कोटी 62 लाख.
4) जळगाव महानगरपालिकेचा पाणी पुरवठा प्रकल्प- किंमत 221 कोटी 21 लाख रुपये, राज्य शासनाचा हिस्सा 110 कोटी 60 लाख, चालू वर्षी वितरित करावायाचा निधी- 27 कोटी 65 लाख.
5) सांगली-मिरज कुपवाड महानगरपालिकेचा सांगली शहरातील भुयारी गटार प्रकल्प- किंमत 82 कोटी 22 लाख रुपये, राज्य शासनाचा हिस्सा 41 कोटी 11 लाख, चालू वर्षी वितरित करावायाचा निधी- 10 कोटी 28 लाख.
6) सांगली-मिरज कुपवाड महानगरपालिकेचा मिरज शहरातील भुयारी गटार प्रकल्प- किंमत 62 कोटी 30 लाख रुपये, राज्य शासनाचा हिस्सा 31 कोटी 15 लाख, चालू वर्षी वितरित करावायाचा निधी- 7 कोटी 79 लाख.
अशा प्रकारे 6 महानगरपालिकांच्या 616 कोटी 23 लाख रुपयांच्या नवीन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. यामध्ये राज्य शासनाचा निम्मा म्हणजे 308 कोटी 12 लाख रुपयांचा वाटा असून यावर्षी 77 कोटी 3 लक्ष रुपये वितरित करण्यात येणार आहेत.
7) बुलढाणा नगरपालिकेचा पाणी पुरवठा प्रकल्प- किंमत 119 कोटी 76 लाख रुपये, राज्य शासनाचा हिस्सा 95 कोटी 80 लाख, चालू वर्षी वितरित करावायाचा निधी- 23 कोटी 95 लाख.
8) बीड नगरपालिकेचा रस्ते विकास प्रकल्प- किंमत 30 कोटी 82 लाख रुपये, राज्य शासनाचा हिस्सा 15 कोटी 41 लाख, चालू वर्षी वितरित करावायाचा निधी- 3 कोटी 86 लाख.
अशा प्रकारे 2 नगरपालिकांच्या 150 कोटी 58 लाख रुपयांच्या नवीन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. यामध्ये राज्य शासनाचा निम्मा म्हणजे 111 कोटी 21 लाख रुपयांचा वाटा असून यावर्षी 27 कोटी 8 लक्ष रुपये वितरित करण्यात येणार आहेत.
----00-----
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा