प्रशांत दामले
अभिनयाची चालती-बोलती कार्यशाळा
                                                -
मुख्यमंत्री
          मुंबई,
दि. 6 : आपल्या चतुरस्त्र अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात ध्रुव ताऱ्याप्रमाणे
अढळस्थान निर्माण करणारे प्रशांत दामले ही अभिनयाची चालती-बोलती कार्यशाळा आहे,
अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दामले यांचा काल गौरव केला.
            रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित प्रशांत दामले यांच्या रंगभूमीवरील
विश्वविक्रमी 10,700 व्या नाट्य प्रयोगानिमित्त आयोजित सत्कार समारंभात मुख्यमंत्री
बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, मुंबईचे महापौर सुनील
प्रभू, माजी आमदार उल्हास पवार, नाट्य सृष्टीतील मान्यवर तसेच रसिक बहुसंख्येने
उपस्थित होते.
            लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या नावावर तब्बल पाच रेकॉर्डस्
नोंदविणारे प्रशांत दामले आज रंगभूमीवरील आपल्या कारर्कीदीचा 10,700 वा प्रयोग
सादर करीत आहेत. असा विक्रम करणारे श्री. दामले या प्रयोगाने जगातील पहिले कलाकार
ठरले आहे. मुख्यमंत्री म्हणून याचा मला अभिमान वाटतो असे सांगून मुख्यमंत्री
म्हणाले, या विक्रमाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये निश्चितच नोंद होईल. प्रशांत
दामले यांच्या वाट्याला आलेले लोकप्रियतेचे प्रचंड वलय कोणालाही लाभले नाही.
मनोरंजन क्षेत्रात हमखास हसवणूक करणारी प्रतिमा त्यांनी नाट्य रसिकांच्या मनात
कायम कोरली आहे. 
            1983
मध्ये 'टुरटुर' या नाटकापासून नाट्य कारर्कीदीला सुरुवात करुन प्रशांत दामले यांची
30 वर्षाच्या काळात 28 नाटकं, 37 चित्रपट आणि 24 मराठी मालिका अशी अचंबित करणारी कारर्किद आहे. आपल्या कारकीर्दीत त्यांनी नाट्य प्रयोगाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वही जपले आहे. विविध लहान-मोठ्या कार्यातून त्यांचा समाजाला मदत करण्याचा हेतू दिसून येतो आणि हेच त्यांचे वेगळेपण आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भावी वाटचालीस सर्व रसिक जनतेच्या वतीने शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री. दामले यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

            यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांनी प्रशांत
दामले यांचे कौतुक करताना मराठी रंगभूमीच्या माध्यमातून मराठी माणसाचे नाव जागतिक
पातळीवर नेण्याचे महत्त्वाचे काम केल्याचे सांगितले आणि प्रशांत दामले यांची पद्म
पुरस्कारासाठी शिफारस करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली.
            सत्काराला उत्तर देताना श्री. दामले यांनी निर्माते,
सहकलाकार आणि बॅकस्टेज कलाकार यांच्या सहकार्यामुळे आजपर्यंतची वाटचाल करु शकलो,
अशी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व माजी
मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेने अधिक ताकद मिळाली, असेही सांगितले.
            यावेळी महापौर सुनील प्रभू व उल्हास पवार यांनी देखील श्री.
दामले यांचा गौरव करणारे मनोगत व्यक्त केले.
0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा