राज्यातील दुष्काळी परिस्थिती
15 सप्टेंबरपूर्वी नजर पैसेवारीची प्रक्रिया पूर्ण करणार
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. 15
सप्टेंबर पूर्वी नजर पैसेवारीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतरच
दुष्काळाबाबत द्यावयाच्या सवलतींविषयी निर्णय घेण्यात येईल. सरकारने यापुर्वीच 123
तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असून आवश्यकतेप्रमाणे टँकरने पाणीपुरवठा, पुरेशा
कामांची उपलब्धता, किमान 250 जनावरे असल्यास छावणी सुरु करणे, असे निर्णय घेण्यात
आले आहेत. दुष्काळी भागात पाणीपुरवठा योजनांसाठी हगणदारी मुक्तीची अट एक वर्ष
शिथिल करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. राज्यातील साखर कारखान्यांनी त्यांच्या
कार्यक्षेत्रात गुरांच्या जास्तीत जास्त छावण्या उघडाव्यात असे आवाहनही करण्यात
आले आहे.
5 जिल्ह्यात 100 टक्क्यांपेक्षा
जास्त पाऊस
28
ऑगस्ट च्या आकडेवारीनुसार राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये
100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला असून 11 जिल्ह्यात
76 ते 100 टक्के, 16 जिल्ह्यात
50 ते 75 टक्के आणि 3 जिल्ह्यात
50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
धरणात 54 टक्के पाणी साठा
राज्यातील धरणात 54 टक्के पाणी साठा असून गेल्या वर्षी
याच सुमारास 67 टक्के पाणी साठा होता. कोकणातील धरणांमध्ये 85 टक्के पाणी साठा असून मराठवाड्यातील धरणांमध्ये 9 टक्के
पाणी साठा आहे. इतर ठिकाणची परिस्थिती पुढील प्रमाणे आहे.
नागपूर 75 टक्के, अमरावती 60 टक्के,
नाशिक 42 टक्के, पुणे
62 टक्के आणि इतर धरणे 82 टक्के.
टँकर्स
राज्यातील 1417 गावे आणि 6179 वाड्यांना
1939 टँकर्सनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. गेल्या वर्षी याच सुमारास केवळ
67 टँकर्स पाणी पुरवठा करीत होते.
गुरांच्या 130 छावण्या
राज्यात 130 छावण्यांमधून 62,245
जनावरांना चारा देण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्यात 96, नाशिक जिल्ह्यात 2, सातारा जिल्ह्यात 31 आणि सांगली जिल्ह्यात 1 अशा छावण्या सुरु आहेत.
रोहयो
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत 33857 कामे
सुरु असून 2 लाख 5 हजार 479 मजुरांची उपस्थिती आहे.
पॅकेजचा खर्च
कापूस, सोयाबीन व धान उत्पादकांना 2 हजार कोटींचे अर्थसहाय्य
मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी 1663 कोटी 72 लाख इतका निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे.
केंद्राची मदत
टंचाई परिस्थितीबाबत केंद्र शासनाला विनंती करण्यात आली असून 2 हजार 281 कोटी 37 लाख इतक्या निधीची
मागणी करण्यात आली आहे. केंद्र शासनाने आतापर्यंत 574 कोटी रुपये इतकी मदत दिली
आहे. पाणी पुरवठा योजनेकरिता 130 कोटी इतका निधी तर चारा डेपोकरिता
240 कोटी 14 लाख व जनावरांच्या छावण्याकरिता
15 कोटी 15 लाख रुपये इतका निधी वितरित करण्यात
आला आहे.
-----0----
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा