26/11 च्या हल्ल्यातील हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांची आदरांजली;
पोलिस दल अधिक सुसज्ज करण्यास प्राधान्य
पुणे दि 26 : 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री आपल्या
संदेशात म्हणतात की, या दहशतवादी हल्ल्यात जे शूर आणि कर्तव्यदक्ष
पोलिस अधिकारी, कर्मचारी मुंबईच्या सुरक्षेसाठी अतिरेक्यांशी लढले आणि आमच्या सुरक्षेसाठी
ज्यांनी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले, त्या हुतात्म्यांना मी विनम्र
आदरांजली अर्पण करतो. या क्रूर अतिरेकी हल्ल्यात ज्या निरपराध नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले, त्यांनाही
मी श्रद्धांजली अर्पण करतो.
राज्यातील नागरिकांची
सुरक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि त्यासाठी पोलिस दल अत्याधुनिक शस्त्रे
आणि यंत्रणांनी सुसज्ज करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. 26/11 चा
हल्ला परतवून लावण्यात ज्या शूर पोलिस
अधिकारी व कर्मचा-यांनी आपले योगदान दिले, त्यांचा आम्हाला अभिमान आहे.
सुरक्षेशी कटिबद्धता हीच हुतात्म्यांना खरी आदरांजली आहे
असेही मुख्यमंत्री म्हणतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा