कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जनतेचा विश्वास
संपादन करणे
गरजेचे - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 6 : राज्याच्या विकासासाठी उद्योगधंद्याच्या
वाढीबरोबरच सामाजिक सलोखा व शांततेची आवश्यकता
असून राज्यात कायदा व सुव्यवस्था
राखण्यासाठी जनतेचा विश्वास संपादन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे
केले.
राज्याच्या पोलीस मुख्यालयातील कौन्सिल हॉल येथे आयोजित पोलिसांच्या वार्षिक परिषदेच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर.आर.पाटील, राज्यमंत्री सतेज पाटील, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.अमिताभ राजन, पोलीस महासंचालक डॉ. संजीव दयाळ, पोलीस आयुक्त राकेश मारिया तसेच राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
राज्यात लोकसभा निवडणूका शांततापूर्ण वातावरणात पार पाडल्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन मुख्यमंत्री म्हणाले, येणारे सण
व उत्सवतसेच विधानसभा निवडणूका लक्षात घेतापोलीस अधिकाऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. राज्यासमोर जातीय तणाव, नक्षलवाद, महिलांवरील अत्याचार, आर्थिक गुन्हे तसेच सायबर क्राईम आदी आव्हाने आहेत. त्यांना समर्थपणे सामोरे जाण्याचे प्रशिक्षण देण्याबरेाबरच पोलीस अधिकाऱ्यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील.
महिलांच्या सुरक्षिततेकडे अधिक गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले. मागील निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अथक परिश्रम केलेल्या पोलीसांना महसूल कर्मचाऱ्यांप्रमाणे मानधन तसेच नक्षलग्रस्त भागात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पोलीसांना आर्थिक स्वरुपात मानधन देण्याबाबतही विचार करण्यात येईल. पोलिसांच्या पदोन्नतीबाबत तातडीने लक्ष घालावे असे निर्देशही त्यांनी दिले. राज्यातील विविध शहरांमध्ये सीसी टीव्ही लावण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अजित पवार म्हणाले, निष्ठेने व
प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे राहील. पोलिसांच्या समस्या व
योग्य मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. पोलीस भरती प्रक्रिया अधिक पारदर्शककरुन सशक्त व
गुणवंत उमेदवारांना पोलीस भरतीत प्राधान्य देण्यात येईल. गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला तरच हे राज्य कायद्याचे आहे, असा विश्वास जनतेत निर्माण होईल.
गृहमंत्री श्री. पाटील म्हणाले, लोकसभेप्रमाणेच
विधानसभा निवडणूक काळातही पोलिसांनी कायदा व
सुव्यवस्थेची जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी. पोलिसांच्या समस्या व
विविध मागण्या तसेच त्यांची पदोन्नती व
वेतनवाढ याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालून सकारात्मक निर्णय घ्यावा असे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्ह्यांच्या तपासाची गुणवत्ता वाढविण्याबरोबरच कनिष्ठ अधिकारी व
कर्मचाऱ्यांना समान न्याय द्यावा, असे निर्देश श्री. पाटील यांनी यावेळी दिली.
यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा