शुक्रवार, १८ जुलै, २०१४

विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ॲड. डोंगरे यांच्या निधनाने
एका संघर्षशील कार्यकर्त्याला राज्य मुकले  : मुख्यमंत्री
मुंबई, दि.18 :विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ॲड. सुर्यकांत जागोबाजी डोंगरे यांच्या निधनाने रिपब्लिकन चळवळीतील एक संघर्षशील कार्यकर्त्याला राज्य मुकले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहे. श्री. डोंगरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
उच्च विद्याविभूषीत श्री. डोंगरे यांनी सुरवातीला विद्यार्थी चळवळीला वाहिलेल्या संघर्ष या पाक्षिकाचे तसेच आचार्य अत्रे यांच्या मराठा या पत्रकाचे संपादनही त्यांनी केले होते. त्यानंतर त्यांचा रिपब्लिकन चळवळीशी जवळचा संबंध आला. विविध संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून ते समाजाच्या विकासासाठी कार्यरत होते. विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी मोठी जबाबदारी निभावली. सामाजिक चळवळीत कार्य करीत असताना त्यांनी लेखन, वकीली आणि सहकार क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले. समाजातील शेवटच्या घटकाचा विकास व्हावा, यासाठी ते शेवटपर्यंत लढत राहिले, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी म्हटले आहे.
00000
आदिवासी समाजातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपले : मुख्यमंत्री
मुंबई, दि.18 :माजी आमदार नेताजी राजगडकर यांच्या निधनाने आदिवासी समाजातील एक अग्रणी नेता आणि अभ्यासू व्यक्तिमत्व हरपले असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
आकाशवाणीवरील सायंकाळच्या बातम्यांमुळे संपूर्ण विदर्भात लोकप्रिय झालेल्या नेताजी राजगडकर यांचा पिंड हा सामाजिक कार्यकर्त्याचा होता. दीन, दलित व आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ते शेवटपर्यंत लढत राहिले.विधानसभेतील त्यांची कारकिर्द संस्मरणीय राहिली. सभागृहातील अभ्यासपूर्ण भाषणामुळे त्यांनी अनेकांची मने जिंकली होती.आदिवासी समाजाच्या संशोधनामुळेते संपूर्ण राज्यात परिचित होते. शिक्षणाशिवाय आदिवासी समाजाचा विकास होणार नाहीही जाणीव त्यांना होती, असेही मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा