मुंढवा येथील मृतप्राणी विल्हेवाट प्रकल्पाला
विभागाने मान्यता नाकारली : न्यायालयाचीही मनाई
मुंबई, दि. १७: हवेली तालुक्यातील (जि. पुणे)
केशवनगर, मुंढवा येथे मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्याच्या (Carcass Plant) प्रस्तावित प्रकल्पाला शासकीय धोरणाला अनुसरुन पर्यावरण विभागाने मान्यता
नाकारली आहे. तसेच उच्च न्यायालयानेही या प्रकल्पाला मनाई केली आहे.
हा मूळ प्रकल्प देवाची ऊरुळी येथे होता. पण
तेथे कोणत्याही सुविधा नसल्याने, तसेच लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी विरोध केल्याने
तो बंद करण्यात आला. यानंतर पुणे महानगरपालिकेने हवेली तालुक्यातील केशवनगर,
मुंढवा येथे ५७ हेक्टर जागेवर हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला.
हा प्रकल्प नदीपासुन ३०० मीटर अंतराच्या आत
असल्याने नदी पुनर्विलोकन समितीने तो अमान्य केला. महानगरपालिकेने याविरुद्धचे अपिल पर्यावरण
विभागाकडे केले. यासंदर्भात दि. ७ जून २०१३ व ५ सप्टेंबर २०१३ रोजी दोन बैठका
झाल्या. शासनाच्या नदर धोरणानुसार असा
प्रकल्प ना-विकास क्षेत्रात (नो डेव्हलपमेन्ट झोन) असता कामा नये. तसेच मृत
प्राण्यांची विल्हेवाट लावताना ते जाळुन नष्ट करावे लागतात. असा प्रकल्प ‘लाल
संवर्गा’मध्ये (रेड कॅटेगरी) मोडतो. याबाबतचे शासकीय धोरण मंत्रिमंडळाच्या
मान्यतेने तयार करण्यात आलेले आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन पुनर्विलोकन समितीने
प्रकल्पाला परवानगी नाकारली.
दरम्यान, उच्च न्यायालयाने रिट अर्ज क्र.
५६८४/२०१३ प्रकरणी दि. ११ जुलै २०१३ रोजी, न्यायालयाच्या परवानगीशिवाय हा प्रकल्प
सुरु करण्यात येऊ नये, असे आदेश दिले. यामुळे नदीपात्रापासुन ३०० मीटरची मर्यादा
शिथिल करण्याचा महानगरपालिकेचा प्रस्ताव पर्यावरण विभागाचे अभिप्राय आणि शासनाचे
धोरण यानुसार अमान्य करण्यात आला आहे.
०००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा