मंगळवार, १८ मार्च, २०१४

मुख्यमंत्री कोट्यातील घरांबाबत तोतयेगिरी
करणाऱ्यांपासुन फसवणुक टाळण्याचे आवाहन

मुंबई, दि. १८ : मुख्यमंत्री कोट्यातून ‘म्हाडा’चे किंवा अन्य योजनेतील घर मिळवुन देतो, अशा प्रकारची आश्वासने देणाऱ्यांपासुन जनतेने स्वत:ची फसवणुक करुन घेऊ नये. असे आवाहन मुख्यमंत्री सचिवालयाने केले आहे.
काही व्यक्ती ‘आपण मुख्यमंत्री सचिवालयात अधिकारी किंवा कर्मचारी आहे, मुख्यमंत्र्यांचा स्वीय सहायक आहे’, अशा प्रकारची तोतयेगिरी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र जनतेने अशा व्यक्तींपासून सावध रहावे. अशा प्रकारे कोणीही संपर्क साधल्यास त्वरित जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधुन तक्रार दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा