फ्लेक्स, बॅनर्स न लावता गारपीटग्रस्तांना
मदत करण्याचे हितचिंतकांना आवाहन
मुंबई, दि. 15 : राज्यात गारपीटीमुळे निर्माण
झालेली गंभीर समस्या लक्षात घेऊन यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे. श्री. चव्हाण आपल्या वाढदिवशी, दि.
17 मार्च रोजी मुंबईमध्ये उपलब्ध नसतील. वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे फ्लेक्स,
बॅनर्स, जाहिराती, पुष्पहार व गुच्छ यावर खर्च न करता ती रक्कम गारपीटग्रस्तांची
मदत करण्यात खर्च करावी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
याबाबत
आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे की, गेली दोन वर्षे
राज्यात सलग भीषण दुष्काळाचे संकट आले होते. यातून शेतकरी सावरतो न सावरतो, तोच
गारपीटीने त्याला उद्ध्वस्त केले आहे. राज्यातील ही परिस्थिती लक्षात घेता
वाढदिवसासारखा समारंभ करणे औचित्याला धरुन होणार नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला
असुन हितचिंतकांनी गारपीटग्रस्तांची मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही श्री.
चव्हाण यांनी केले आहे.
00000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा