मुंबई, दिनांक 15: ज्येष्ठ गीतकार व कवी सुधीर मोघे यांच्या
निधनाने महाराष्ट्राने बहुमुखी प्रतिभेचा एक अष्टपैलू कलावंत गमावला असल्याची
प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, सुधीर मोघे यांच्या भावस्पर्शी
गीतांना मराठी मनाच्या भावविश्वात आगळेवेगळे स्थान आहे. अनेक चित्रपटातून अजरामर
ठरलेली त्यांची गीते आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. त्यांची प्रतिभा केवळ गीतलेखनापुरती
मर्यादित नव्हती. ते तितकेच प्रतिभासंपन्न संगीतकारही होते. पटकथालेखन असो वा
संवादलेखन, त्यांनी विविध क्षेत्रात आपला वेगळा व स्वतंत्र ठसा उमटवला होता.
यासोबतच रंगमंचीय अविष्कारही ते तेवढ्याच समर्थपणे करत. सर्वोत्कृष्ट
गीतलेखनासाठीचा राज्य शासनाचा पुरस्कार त्यांनी चार वेळा पटकावला होता. त्यांची
उणीव मराठी रसिकांना चित्रपटसृष्टीला सदैव जाणवेल.
----------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा