राज्यात ‘स्मार्ट’ शहरे उभारण्यासाठी ॲक्सेनच्यर सहकार्य
करणार;
मुख्यमंत्र्यांची दावोस येथे कंपनीसमवेत चर्चा
मुंबई, दि. 24 : राज्यात ‘स्मार्ट’ शहरे उभारण्यासंदर्भात ॲक्सेनच्यर (Accenture) या
कंपनीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समवेत काल दावोस येथे चर्चा केली. मुख्यमंत्री वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक
बैठकीसाठी दावोस (स्वित्झरलँड) येथे गेले असून त्या ठिकाणी त्यांच्या विविध
मातब्ब्ार कंपन्यांसमवेत गुंतवणुकीसंदर्भात गाठीभेटी सुरु आहेत. काल ॲक्सेनच्यर या जागतिक सल्लागार कंपनीचे
व्यवस्थापकीय संचालक पिटर लॅसी आणि मुख्य अधिकारी जुली स्वीट यांच्याशी
मुख्यमंत्र्यांची विस्तृत चर्चा झाली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी उत्तम
शहरांच्या उभारणीसाठी एक मजबूत अंमलबजावणी यंत्रणा आवश्यक असून पुण्यातील
हिंजेवाडी, औरंगाबाद येथील
बिडकीन-शेंद्रा या ठिकाणी तसेच
दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडॉरमधील शहरांमध्ये ‘स्मार्ट’ शहरांचे मॉडेल कसे राबविता
येईल यावर चर्चा केली. ॲक्सेनच्यर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अशा शहरांसाठी मॉडेल्स
उभारण्यात रुची दाखविली. या कंपनीला शहर
विकासातील अनुभव असून शहराचे पर्यावरण, लोक, रहाणीमान, प्रशासन यामध्ये
स्पर्धात्मक सुधारणा करण्यावर त्यांचा भर आहे असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना
सांगितले.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा