डॉ. सय्यदना मोहंमद बुऱ्हानुद्दीन यांच्या निधनाने
सर्वधर्म समभावाचा संदेश देणारा महान धर्मगुरू हरपला : मुख्यमंत्री
दि. 17 : डॉ. सय्यदना बुऱ्हानुद्दीन यांच्या निधनाने सर्वधर्म समभाव आणि शांततेचा संदेश देणारे एक महान आध्यात्मिक धर्मगुरू आपल्यातून गेले असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरू असलेल्या डॉ. सय्यदना हे सर्व धर्मियांमध्ये आदराचे स्थान मिळालेले व्यक्तिमत्व होते. त्यांनी देशाची एकात्मता, अखंडता आणि सर्वधर्मसमभावाचा कायम पुरस्कार केला. त्यांच्या प्रवचनांमधून शांतता आणि मुल्यांची शिकवण दिली जायची. समाजाचे वैचारिक उत्थानासाठी आणि विश्वशांतीसाठी संपूर्ण आयुष्य वेचलेल्या डॉ. सय्यदना यांना जगभरातील असंख्य अनुयायींची साथ लाभली. मध्यमवर्गीय, गरीब दाऊदी बोहरा समाज बांधवांच्या विकासासाठी आणि त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्याचप्रमाणे देशातील बोहरा समाजातील गरजूंना घरपोच अन्न पोचविणे, दुष्काळग्रस्त भागांमध्ये पाण्याच्या योजना राबविणे, यासारखे सामाजिक उपक्रम हाती घेऊन डॉ. सय्यदना यांनी आपल्यातील संवेदनशीलतेचा परिचय करून दिला. त्यांच्या निधनाने देश एक राष्ट्रभक्त आणि विकासाची दृष्टी असलेला महान धर्मगुरू आपण गमावला आहे, असेही मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा