पंतप्रधान अनुदान प्रकल्पातून
नुतनीकरण केलेल्या
इमारतींच्या देखभालीसाठी विशेष
तरतूद
रहिवाशांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून
दखल
मुंबई दि. 28 नोव्हेंबर: केंद्र शासनाच्या पंतप्रधान अनुदान
प्रकल्पांतर्गत नागरी नुतनीकरण प्रकल्प योजनेतून बांधण्यात आलेल्या 66
इमारतींच्या देखभालीकरीता विशेष तरतूद
करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या ठिकाणचे रहिवासी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीची
दखल घेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंदर्भात हा निर्णय घेतला आहे. यानुसार राज्य शासनाने आपल्या विशेष अधिकाराचा वापर
करून पुढील 5 वर्षाकरीता दरवर्षी 25
कोटी रुपया प्रमाणे अर्थसंकल्पात तरतूद करण्याच्या सुचना म्हाडाला दिल्या आहेत.
याद्वारे या इमारतींची दुरुस्ती करण्यात येईल.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा