बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१३

महाराष्ट्राचा विकास आराखडा तयार ;
प्रगत राज्य म्हणून आगेकूच कायम राहील
मुख्यमंत्री चव्हाण यांचे भारतीय महिला पत्रकार संघात आश्‍वासन
 नवी दिल्ली, दि.13 नोव्हेंबर : महाराष्ट्राचा सर्वागिण विकास करण्याकरिता पाच कलमी आराखडा तयार केला असून राज्यात प्रत्येक नागरीकाला त्याच्या सर्वांगिण विकासाची संधी देणारे वातावरण तयार होत आहे. त्यासाठी मूलभूत आवश्यकता असणा-या पंचसूत्रीचा अवलंब आपल्या काळात करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केले.
        येथील भारतीय महिला पत्रकार संघामध्ये आयोजित विशेष वार्तालाप कार्यक्रमात देश विदेशातील महिला पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राज्याचा समतोल तसेच सर्वागिण विकास साधण्याकरीता पाच कलमी आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये  राज्यातील प्रत्येक भागाकडे लक्ष देणे, राज्याला कुपोषण मुक्त करणे, उद्योगवाढ करणे,  जिल्हा पातळीवरच नव्हेतर तालुका स्तरापर्यंत मानव विकास निर्देशांक तयार करणे, प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, असा पाच कलमी आराखडा महाराष्ट्र शासनाने तयार केला आहे. या अंतर्गत राज्यातील शेवटच्या नागरीकापर्यंत शासन पोहोचेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
        शासनात पारदर्शकता आणण्याकरीता राज्य शासन ई-गव्हरर्नसला महत्व देत असल्याचे विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देतांना मुख्यमंत्री यांनी विदीत केले. जुन्या झालेल्या कायदयामध्ये सुधारणा करूण अधिकाधिक लोकोपयोगी कायदे करण्याबाबतही त्यांनी सांगितले. मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकरच्या कसोटी क्रिकेटच्या निवृत्ती बद्दलच्या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना मुख्यमंत्री म्हणाले, मध्यवर्गीय कुंटुबात जन्म घेऊनही कर्तृत्वाच्या बळावर सचिनने संपूर्ण जगात आपले नाव लौकिक केले आहे.  
लता मंगेशकर यांच्यासंदर्भात सध्या सुरु असलेल्या प्रतिक्रीयांबाबतच्या प्रश्नाला उत्तर देतांना मुख्यमंत्री म्हणाले, कलाकारांना देण्यात येणारे पुरस्कार हे त्यांची वैयक्तिक उपलब्धता आहे. त्या क्षेत्रातील प्रविण्यासाठी त्यांना हे पुरस्कार मिळतात. राजकारणाशी त्याचा काहीही संबंध नाही. प्रत्येकाची आपली राजकीय मते असू शकतात. तत्पूर्वी आज पंतप्रधानासह  इतर केंद्रीय मंत्र्यांशी झालेल्या भेटीचा गोषवारा मुख्यमंत्री यांनी यावेळी दिला.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा