सीएम:11-11-2010
ते 11-11-2013: काल ११ नोव्हेंबरला
सीएमसरांच्या कारकिर्दीला तीन वर्षे पूर्ण झाली. बॅनर्स नाहीत, जाहिराती नाहीत,
कसलाही गाजावाजा नाही, एखाददुसरा अपवाद वगळला तर मुलाखती नाहीत, कसलंही सेलिब्रेशन
नाही, अशा पद्धतीनं सरांनी आपल्या कारकिर्दीचा तिसरा वाढदिवस साजरा केला तो अतिशय
व्यस्त दिनक्रमातच. सकाळी 9.30 वाजता ते वर्षा निवासस्थानी अभ्यागतांना भेटले, 10
वाजता मंत्रालयासमोरच्या गांधी भवनात पक्षाने आयोजित सत्कार समारंभाला उपस्थित
राहिले. ११ वाजता ते सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित मौ. अबुल कलाम आझाद जयंतीच्या
कार्यक्रमाला हजर झाले. नंतर ‘लोकराज्य’च्या विशेषांकाचं प्रकाशन केलं. 12 ते 2.30
पर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत त्यांनी
ऐतिहासिक पॅकेजचा निर्णय घेतला. यानंतर मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक होती. 3.30
वाजता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद
साधुन नवी मुंबई पॅकेजची माहिती दिली. 4 वाजता ते कांदिवलीला सचिन
तेंडुलकरच्या सत्काराला जायला निघाले, तेव्हा दुपारच्या जेवणाची आठवण केली तर
म्हणाले, ‘आता राहु दे.’ (टिफिन होता तसाच
बंगल्यावर पाठवला.) हेलिकॉप्टरने 4.30 ला कांदिवलीला पोचले. सचिनचा कार्यक्रम
आटोपून सह्याद्रीवर परतले, तर कॅम्पा कोलाचं शिष्टमंडळ वाटच पहात होतं. त्यांची
भेट झाल्यावर शेतकरी संघटनांचे शिष्टमंडळ ऊस दर, साखर कारखानदारीचे प्रश्न आदीच्या
चर्चेसाठी थांबले होते, त्यांची चर्चा संपल्यांनंतर सरांनी काही अभ्यागतांची भेट
घेतली. नवी दिल्लीला पंतप्रधानांबरोबर होणाऱ्या बैठकीचं ब्रिफिंग वरिष्ठ
अधिकाऱ्यांकडुन घेतलं. रात्री 10.30 वाजता वर्षावर पोचल्यावर टपाल पाहिलं.
काही महत्वाच्या फाईल हातावेगळ्या केल्या. त्यानंतर रात्री 11.30च्या सुमारास ते
निवासस्थानी गेले. गेली तीन वर्षं अगदी जवळुन पहातोय सरांचा रोजचा दिवस थोडाफार
असाच (सकाळी 9.30 ते रात्री 2.00) असा प्रचंड धावपळीत जातो. आणि आता काल दिवसभर
आणि आतापर्यंत चर्चा ऐकतोय....काहीजण म्हणतायत मुख्यमंत्री कामच करीत नाहीत....आता
बोला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा