शहीद पुंडलिक माने यांचे बलिदान विसरणार नाही - मुख्यमंत्री
मुंबई दि:८ - देशाच्या पुँछ सेक्टरमधील
सरला या लष्करी चौकीवर झालेल्या हल्यात मराठा रेजिमेंटचे नायक पुंडलिक माने शहीद
झाले. त्यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला
आहे. सोमवारी रात्री दहशतवाद्यांच्या हल्ल्यात २१-बिहार रेजिमेंटचे चार जवान देखील
शहीद झाले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निधनाबद्धल देखील दु:ख व्यक्त केले आहे.
श्री माने हे कागल तालुक्यातील पिंपळगावचे होते.
देशाचे संरक्षण करणे असो
किंवा कुठल्याही आपत्तीत मदतीला धाऊन जाणे असो, महाराष्ट्राचे जवान नेहमीच आघाडीवर
असतात आणि प्रसंगी प्राणाचे मोल बजावणाऱ्या या जवानांविषयी आमच्या सर्वांच्या मनात
अभिमानाची भावना आहे. पुंडलिक माने यांच्यावर योग्य इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात
येतील तसेच त्यांच्या कुटुंबियांना संपूर्ण मदत केली जाईल असेही मुख्यमंत्री
आपल्या शोकसंदेशात म्हणतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा