जयंवतराव भोसले यांच्या निधनाने सहकारक्षेत्रातील
कार्यकर्त्यांचा आधारवड हरपला : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 5 : सहकारी
चळवळीच्या माध्यमातून उद्योग, शिक्षण,आरोग्य या मुलभूत क्षेत्रात विकासाची गंगा आणणाऱ्या
आणि कराड परिसरातील सर्वसामान्यांना आधार देणाऱ्या
स्व. जयवंतराव भोसले यांच्या निधनाने सहकार चळवळीतील कार्यकर्त्यांचा आधारवड हरपला
आहे, या शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री श्री.
चव्हाण शोकसंदेशात म्हणतात की, स्व. भोसले यांनी आपले संपूर्ण आयुष्य कराड परिसराच्या विकासासाठी वेचले. वकिलीचे शिक्षण
पूर्ण करुनही त्यांनी व्यवसाय न करता स्वत:ला सामाजिक कार्यामघ्ये झोकुन दिले. कराड
परिसरात त्यांनी उभारलेल्या मोठमोठ्या संस्था आज सामाजिक विकासाची केंद्रे बनली आहेत.
विधानपरिषदेचे सदस्य म्हणुनही त्यांनी ग्रामीण भागाचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला.
ज्येष्ठ नेते यशवंतराव मोहिते यांच्या सोबतीने त्यांनी कृष्णा सहकारी साखर कारखान्याची
मुहुर्तमेढ रोवली. आपल्या अतिशय व्यस्त दिनक्रमातून ते वाचनासाठी आवर्जून वेळ काढीत.
वाचनाचा त्यांना व्यासंगच होता. उत्तम पुस्तकांचे वाचन, काव्य, इतिहास, तत्वज्ञान,
अध्यात्म यांची त्यांना आवड होती. यामुळेच ते राजकारण, सहकार, आरोग्य, कृषि, साखर कारखानदारी
अशा वेगवेगळ्या क्षेत्रात ते महत्वपूर्ण योगदान देऊ शकले. केवळ कराडच नव्हे तर सातारा
परिसरात परवलीचा शब्द बनलेल्या ‘कृष्णा’ उद्योगसमुह त्यांच्या कार्याची सदैव साक्ष
देत राहिल. ‘जीवनयात्रा’ या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी आपला संपूर्ण जीवनप्रवास
वर्णन केला आहे. तो सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा