राष्ट्रीय स्तरावर अव्वल -
मुख्यमंत्री
मुंबई, दि. 5 : महाराष्ट्र पोलीस
कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे कार्य उत्तम प्रकार पार पाडीत असून देश पातळीवर महाराष्ट्र
पोलीसाची कामगिरी अव्वल दर्जाची असून भविष्यातही राज्यातील पोलीस हे स्थान कायम ठेवतील,
असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केला.
महाराष्ट्रातील
गुन्हे-वार्षिक अहवालाचे विमोचन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस
मुख्यालयात झाले. त्यावेळी ते बोलत होते.
वार्षिक अहवालाचे
प्रकाशन केल्यामुळे समाजातील सर्व घटकांमध्ये आपली कामगिरी पोहोचते. तसेच भावी
पोलीस अधिकाऱ्यांनासुद्धा या अहवालातून सतत प्रेरणा मिळत राहील. गुन्हे अन्वेषण
विभागाचे काम अत्यंत प्रशंसनीय असून गुंतागुंतीच्या गुन्ह्यांच्या सोडवणूकीसाठी हा
विभाग महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
इतर
राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये गुन्ह्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे, असे
सांगून गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी पोलीसांच्या कामगिरीचे कौतुक केले.
चांगली
कामगिरी केलेल्या राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना यावेळी प्रशस्तीपत्रक
देऊन गौरविण्यात आले.
यावेळी
गृह राज्यमंत्री सतेज पाटील, अपर मुख्य सचिव (गृह) अमिताभ राजन, पोलीस महासंचालक
सत्यपाल सिंग, मुंबई पोलीस आयुक्त संजीव दयाळ तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी
उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा