राज्य शासनाकडून अधिकृत वापर
मुंबई, दि. ९ : नवी
दिल्ली येथील ११, रेस कोर्स रोड या शासकीय निवासस्थानाचे वितरण केंद्रीय
मंत्रिमंडळाच्या निवासस्थान उपसमितीने महाराष्ट्र शासनाला केले आहे. या
निवासस्थानाचा वापर राज्य शासनाकडुन अधिकृतपणे केला जात आहे, असे मुख्यमंत्री
सचिवालयाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
नवी दिल्ली येथील केंद्र
शासनाच्या निवासस्थानांचे वितरण प्रत्येक राज्य सरकारला केले जाते. केंद्रीय
मंत्रिमंडळाने प्राधिकृत केलेली उपसमिती या निवासस्थानांचे वितरण करते. श्री. पृथ्वीराज
चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या
निवासस्थान उपसमितीने या निवासस्थानाचे वितरण महाराष्ट्र शासनाला केले आहे. मा.
मुख्यमंत्री महोदयांचे नवी दिल्ली येथील शासकीय कामकाज, विविध बैठका, परिषदांवेळी हे
निवासस्थान राज्य सरकारने मा. मुख्यमंत्री
यांच्यासाठी राखुन ठेवण्यात आले आहे. या निवासस्थानाचे
वितरण राज्य सरकारला झाले असल्याने ते अनधिकृतरित्या वापरले जात असल्याचे काही
वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांवरुन प्रसारित झालेले वृत्त वस्तुस्थितीला धरुन नाही,
असे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
०००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा