मुंबईत
आजपासून १० भाजीपाला विक्री केंद्रे सुरु
मुंबई, दि. 8 : मुंबई
शहरातील ग्राहकांना किफायतशीर दराने भाजीपाला उपलब्ध करुन देण्यासाठी कृषी व पणन
विभागाच्या माध्यमातून उद्या (मंगळवार) पासून पहिल्या टप्प्यात दहा भाजीपाला
विक्री केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत.
मागील काही दिवसांपासून
भाजीपाल्यांच्या किरकोळ दरात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. या दर वाढीवर नियंत्रण
आणण्यासाठी शासनाने भाजीपाला बाजार हस्तक्षेप योजना सुरु करुन मुंबईतील ग्राहकांना
रास्तदरात भाजीपाला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी सामाजिक संस्था, सहकारी
संस्था यांच्या माध्यमातून भाजीपाला विक्री केंद्र सुरु करण्यात येत आहेत. केंद्र
सुरु करण्यासाठी जागा उपलब्ध करणे, सामाजिक, सहकारी संस्था यांनी पुढाकार घेणे
तसेच या संस्थांपर्यंत भाजीपाला पोहोचविण्याची व्यवस्था करणे हे सर्व या
प्रक्रियेचे महत्वाचे टप्पे आहेत. सर्व बाबी पूर्ण करण्यात आल्या असून उद्या पासून
ही केंद्रे सुरु होणार आहेत.
आतापर्यंत 40 सामाजिक
संस्थांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी संमती दर्शविली आहे. त्यांची छाननी सुरु
आहे. त्यांच्यापर्यंत 2-3 दिवसात कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत भाजीपाला पोहोचविला जाईल. या योजनेसाठी 100 गृहनिर्माण
संस्था पुढे आल्या असून त्यांच्याकडे देखील विक्री केंद्रे सुरु करण्यात येतील. या
व्यतिरिक्त ज्या सामाजिक संस्था भाजीपाला विक्री केंद्र सुरु करण्याची तयारी
दर्शवतील, त्यांच्यामार्फत अशी विक्री केंद्र सुरु करण्यात येतील. मध्यस्थीमुळे
भाजीपाला दरातील होणारी वाढीवर नियंत्रण आणणे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत
किरकोळ भाजीपाला विक्री केंद्र सुरु करुन बाजारभावात हस्तक्षेप करण्याचा शासन
प्रयत्न आहे. कारण सर्वसामान्य नागरिकांना रास्त दरात भाजीपाला उपलब्ध व्हावा, हा
या योजने मागचा उद्देश आहे.
भाजीपाला विक्री
केंद्राची नावे व दूरदध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे-
·
सुपारीबाग मध्यवर्ती ग्राहक संघ, लक्ष्मण निवास, सेंट्रल
रेल्वे वर्कशॉपच्या समोर, चढ्ढा बिल्डिंग, डॉ. आंबेडकर रोड, परेल, मुंबई 12, (022-24131395);
·
सुपारीबाग मध्यवर्ती ग्राहक संघ, धनतेरस बिल्डिंग,
लाडूसम्राट जवळ, डॉ. आंबेडकर रोड, लालबाग, मुंबई, (9869058944) ;
·
अपना बाजार डिपार्टंमेंट स्टोअर्स नायगांव, 106-ए.
जी.के.रोड, हिंदमाता टॉकीजजवळ, मुंबई-14, (022-24125341, 9821218665);
·
अपना बाजार डिपार्टंमेंट स्टोअर्स सायन, सरदार नगर नं.1,
हौसिंग कॉलनी, सायन, कोळीवाडा, मुंबई -22, (022-24094605);
·
अपना बाजार डिपार्टंमेंट स्टोअर्स टिळकनगर, सहाकर
टॉकीजसमोर, टिळकनगर, चेंबूर, मुंबई-89, (022-25297922);
·
अपना बाजार डिपार्टंमेंट स्टोअर्स घाटकोपर, जी.बी. पंतनगर,
बिल्डींग नं. 13, घाटकोपर (पूर्व) मुंबई-75, (022-25019500);
·
अपना बाजार डिपार्टंमेंट स्टोअर्स मुलूंड, जवाहरलाल नेहरु
रोड, मुंबई (प)- 80, (02225619910/ 022-25611415);
·
अपना बाजार डिपार्टंमेंट स्टोअर्स चेंबूर, आर.सी.एफ. कॉलनी,
चेंबूर, मुंबई-74, (022-25535323/ 022-25537984)
·
अपना बाजार डिपार्टंमेंट स्टोअर्स अंधेरी, आझाद नगर,
जयप्रकाश रोड, अंधेरी (प), मुंबई -58, (022-26743014/ 022-26740857);
·
सहकार बाजार, पोस्ट ऑफिस बिल्डिंग, शंकर मंदिराजवळ, कळवा,
ठाणे, (022-25337924).
0000000000000000000000000000000000000000000000000000000000000मलकापूरनगरपंचायतीचीप्रियदर्शनीकन्यारत्नयोजना
राज्यभर राबविण्याचा मानस - मुख्यमंत्री
राज्यभर राबविण्याचा मानस - मुख्यमंत्री
सातारा,
दि.8 :-
मलकापूर नगर पंचायतीने मुलींसाठी राबविलेली प्रियदर्शनी कन्या रत्न योजना राज्य शासनामार्फत राज्यभर राबविण्याचा मानस मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. मलकापूर नगरपंचायत
व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थींना मोफत बस पास वाटप व बस सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज मलकापूर येथे करण्यात आला. त्या प्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. समारंभास
गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार रजनी पाटील, आमदार जयकुमार गोरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, डॉ. अतुल भोसले, नगराध्यक्षा शारदा खिलारे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत बांगर, पोलीस अधीक्षक के.एम.एम. प्रसन्ना आदी मान्यवर उपस्थित होते.
मलकापूर नगरपंचायतीची 24X7 नळपाणी
पुरवठा योजना देशभर लौकीकपात्र ठरली असल्याचे स्पष्ट करुन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मलकापूर नगरपंचायतीने नागरिकांना पायाभूत नागरी सुविधा देऊन विकासाचा मोठा टप्पा गाठला आहे. शहरातील मुलींसाठी नगरपंचायतीने विविध योजना हाती घेतल्या असून जन्मलेल्या मुलींसाठी कन्यारत्न योजना प्रभावीपणे राबविली आहे. मुलींसाठी ही एक उत्तम योजना असून ही योजना राज्य शासनामार्फत राज्यभर राबविली जाईल, असेही ते म्हणाले. मलकापूर नगरपंचायतीच्या वतीने विद्यार्थींना मोफत बस पास देणाऱ्या श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियानाच्या यशस्वीतेनंतर ही योजना राज्यभर राबविण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.
मलकापूर नगरपंचायतीच्या सांडपाणी प्रक्रिया योजनेस तसेच नगरपंचायत क्षेत्रात 1200 आसन
क्षमतेचे सभागृह उभारण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली जाईल, असे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मलकापूर नगरपंचायतीने विकास कामे अत्यंत गतीने करुन मॉडेल नगरपंचायत म्हणून विकसीत करण्याबाबत घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी नगरपंचायतीने महिला आणि मुलींसाठी राबविलेल्या विविध योजनांचेही कौतुक केले. नगरपंचायतीच्या विविध उपक्रमांना शासनस्तरावरुन सर्वते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.
दुष्काळावर मात
करण्यासाठी शासनासह
लोकसहभागातून भरीव
काम :
मुख्यमंत्री
राज्यात गेल्या
दोन वर्षात पावसाअभावी निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीवर विविध शासन योजना आणि लोकसहभागातून भरीव काम करुन दुष्काळग्रस्तांना सहाय्यभूत होण्याची भूमिका राज्य शासनाने घेतल्याचे स्पष्ट करुन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, दुष्काळग्रस्तांना सहाय्यभूत होण्यात शासन यंत्रणेबरोबरच विविध सेवाभावी, स्वयंसेवी, सहकारी संस्थांचे मोठे योगदान असून लोकांनी गंभीर दुष्काळी परिस्थितीवर संयमाने आणि जिद्दीने मात करण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले.
दुष्काळ निवाणाच्या उपाययोजनाअंतर्गत राज्यात शासन योजना आणि लोकसहभागातून गाळ काढण्याचे मोठे काम झाले असल्याचे स्पष्ट करुन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, तलावातील माती नालाबांध आणि तलावातील गाळ काढण्याचे काम देशात उल्लेखनीय ठरले आहे. या उपक्रमामुळे पाणीसाठ्यात वाढ होण्याबरोबरच जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होणार आहे. पुणे
विभागातील सातारा, सांगली, सोलापूर, पुणे या चार जिल्ह्यात सिमेंट नालाबांध आणि पाझर तलावातील गाळ लोकसभागातून काढल्यामुळे जवळपास साडेआठ टीएमसी पाणीसाठा झाला असून ही समाधानाची बाब असल्याचेही ते म्हणाले.
राज्यात दुष्काळी
परिस्थितीमध्ये 1
हजार 300 चारा
छावण्या उघडून अडीच लाख जनावरांची सोय करण्यात आली असून या छावण्यातील जनावरांच्या तपासणीबरोबरच छावणीतील लोकांचीही आरोग्य तपासणी केली जात आहे. राज्यात आज 5 हजार टँकरने 11 हजार
गावातील लोकांना पाणी पुरवठा केला जात आहे. टंचाईच्या निवारणासाठी आवश्यक त्या सर्व उपायोजना करण्यास शासनाने प्राधान्य दिले असल्याचेही मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले.
याप्रसंगी गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, मलकापूर नगरपंचायतीने नागरी विकासाचे विविध उपक्रम हाती घेऊन ते यशस्वी केले आहेत. नगरपंचायतीने राबविलेली 24x7 योजनेमुळे
मलकापूर नगरपंचायतीचा देशात लौकीक झाला आहे. नगरपंचायतीने गेल्या 5 वर्षात विकासाची फार मोठी क्रांती केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी डॉ.
सविता मोहिते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी मलकापूरच्या नगराध्यक्षा शारदा खिलारे यांनी स्वागत व सत्कार केला. उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी प्रास्ताविकात मलकापूर नगरपंचायतीने राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली. समारंभास
रजनी पवार, डॉ. सुभाष जोशी, प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार सुधाकर भोसले, गटविकास अधिकारी डॉ.आबासाहेब पवार, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्यासहन अनेक मान्यवर, पदाधिकारी अधिकारी, नागरिक उपस्थित होते.
00000
स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त हाती घेतलेल्या
कराडमधील विविध विकास कामांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
सातारा, दि.8 :- स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त हाती घेतलेल्या कराड शहरातील विविध विकास कामांची पाहणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली.
स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त कराड शहरात विविध विकास कामांसाठी शासनाने निधी दिला असून या विकास कामांच्या संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्यक्षपणे भेट देऊन माहिती घेऊन मार्गदर्शक सूचना केल्या. त्यांच्या समवेत गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे, डॉ.
अतुल भोसले, नगराध्यक्षा शारदा खिलारे, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत बांगर, पोलीस अधीक्षक के.एम.एम. प्रसन्ना आदी मान्यवर उपस्थित होते.
कराड
एस.टी. स्टॅन्ड इमारतीसाठी यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी समितीमार्फत 11 कोटीचा
निधी उपलब्ध करुन दिला असून या निधीतून कराड एस.टी. स्टॅन्ड अत्याधुनिक पध्दतीचे उभारण्यात येणार असून जवळपास 4500 मिटर
बांधकाम करण्यात येणार आहे. यामुळे कराड आणि परिसरातील प्रवाशांची सोय होणार आहे. यासाठीचा सर्वसमावेश आराखडा निश्चित करुन कामाचा लवकरात लवकर शुभारंभ करण्याची सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केली. यावेळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. पाटील, विभाग नियंत्रक श्री. मुंडीवाले, कार्यकारी अभियंता श्री. पोतदार यांनी एस.टी. स्टॅन्ड नवीन इमारतीच्या आराखड्याबाबत माहिती दिली. यानंतर कै. यशवंराव चव्हाण स्मृतीसदनाच्या नुतनीकरणाच्या कामाचीही त्यांनी पहाणी करुन माहिती घेतली. या कामासाठी साडेपाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून हे स्मृतीसदन अत्याधुनिक पध्दतीने बनविण्याची सूचना मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी केली. यावेळी कृष्णा नदीकाठावरील कै. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळावरील विकसीत करण्यात येणाऱ्या बगीचाच्या कामाचीही त्यानी माहिती घेऊन मार्गदर्शक सूचना केल्या.
स्वर्गीय
यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त सातारा जिल्ह्यात सुमारे सव्वा छप्पन्न कोटीच्या निधीतून विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याअंतर्गत कराड येथे हाती घेण्यात आलेल्या कामामध्ये एस.टी स्थानकासाठी 11 कोटी,
कराड शैक्षणिक संकुलात 1200 आसन
क्षमतेच्या सभागृहासाठी 9 कोटी सव्वा पासष्ट लाख, आर्थिक दुर्बल घटकातील मुलींसाठी 200 क्षमतेच्या वसतीगृहासाठी 5 कोटी 84 लाख, टिळक हायस्कूलच्या नुतनीकरणासाठी 2 कोटी, कृष्णा-कोयना संगमावरील स्व. यशवंतराव चव्हाण समाधी परिसर विकसीत करण्याअंतर्गत बागबगीचांसाठी सुमारे 3 कोटी, कराड नगर परिषदेच्या पार्कींग प्लाझा, बहुद्देशीय केंद्र, स्वीमींग पुल, कमान व आयलँड आदींसाठी साडेसहा कोटींची कामे हाती घेण्यात आली आहेत. या शिवाय सातारा सैनिक स्कूल येथे एन.डी.ए. ब्लॉक बांधणे, संरक्षण भिंत
बांधणे व रस्त्याच्या कामासाठी पावणेपाच कोटी आणि सातारा जिल्हा परिषद येथे 1200 आसन
क्षमतेचे सभागृह बांधण्यासाठी 10 कोटीची
कामे हाती घेण्यात आली आहेत.
आयटीआय शेजारील उभारण्यात येणाऱ्या नियोजीत वसतीगृहाच्या तसेच सभागृहाच्या कामाची मुख्यमंत्री श्री. चव्हाण पहाणी करुन माहती घेतली.
यावेळी जिल्हा
नियोजन अधिकारी संजय पाटील, प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार सुधाकर भोसले, मुख्याधिकारी अनिता दगडे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, नागरी उपस्थित होते.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा