विषय : विकास योजना - नागपूर
नागपूर शहराच्या विकास नियंत्रण
नियमावलीमध्ये दाटवस्ती क्षेत्रात वाणिज्य वापर व औद्योगिक वापर याबाबतची तरतूद
समाविष्ट करणेबाबत.
मा.मुख्यमंत्री यांचे विधीमंडळातील
निवेदन
नागपूर
शहराच्या विकास नियंत्रण नियमावलीत, दाटवस्ती क्षेत्रात वाणिज्य वापर व औद्योगिक
वापर यासाठी अनुज्ञेय चटई क्षेत्र निर्देशांकाविषयी स्पष्ट तरतूद नव्हती. सदर तरतूद विकास नियंत्रण नियमावलीत समाविष्ट
होणे नियोजनाच्या दृष्टीने आवश्यक असल्याने शासनाने, नागपूर शहराच्या मंजूर विकास
नियंत्रण नियमावलीत या प्रयोजनार्थ नविन नियम अंतर्भूत करण्यास मान्यता दिली आहे.
सदर
नवीन नियमानुसार दाटवस्ती क्षेत्रातील औद्योगिक विभागात 1.00 चटई क्षेत्र
निर्देशांक अनुज्ञेय असेल तर दाटवस्तीतील वाणिज्यिक विभागात 9.00 मीटर रुंदीपेक्षा
कमी रुंदीच्या रस्त्यालगतच्या भूखंडावर 1.50 चटई क्षेत्र निर्देशांक तर 9.00 मीटर
रुंदीपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यालगतच्या भूखंडावर 2.00 चटई क्षेत्र निर्देशांक
अनुज्ञेय राहील.
******
विषय : विकास
योजना – नागपूर
नागपूर शहराच्या
विकास नियंत्रण नियमावलीतील शहरातील एकूण 24 रस्ते "नो शॉपिंग फ्रंटेज
स्ट्रिट" मधून वगळणेबाबतचा फेरबदलाचा प्रस्ताव.
मा.मुख्यमंत्री यांचे विधीमंडळातील निवेदन
नागपूर शहराकरीता दि.31 मार्च, 2001 रोजी मंजुर करण्यात
आलेल्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये नागपूर शहरातील महत्वाचे मोठया रुंदीचे 24
रस्ते "नो शॉपिंग स्ट्रिट" म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यामुळे सदर रस्त्यांवर वाणिज्य वापर अनुज्ञेय
नव्हता.
नागपूर महानगरपालिकेने वरील 24 रस्ते "नो शॉपिंग
स्ट्रिट" मधुन वगळणेसाठी कलम 37 अन्वये फेरबदलाचा प्रस्ताव शासनास सादर केला
होता. शासनाने सदर फेरबदल प्रस्तावाच्या
विविध बाजूंचा अभ्यास करुन त्यास पुढीलप्रमाणे मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे.
1)
नागपूर शहराच्या मंजूर विकास योजनेत शहरातील एकूण 24 रस्ते "नो शॉपिंग
फ्रंटेज रोड" दर्शवले आहेत, त्याऐवजी सदर रस्ते "नो पार्किंग रोड"
राहतील.
2)
सदर 24 नो पार्किंग रस्त्यांवरील इमारतींना वाणिज्यिक वापरासाठी विहीत मानकापेक्षा
दुप्पट पार्कींग ठेवण्याच्या अटीसह खालील स्वरुपाचे वापर अनुज्ञेय असतील.
(अ) संपुर्ण इमारत हॉटेल, रेस्टॉरंट, हॉस्पिटल,
सार्वजनिक इमारत, कार्यालय इमारत, आर्ट गॅलरी, पेट्रोल पंप व सार्वजनिक वाहनतळे,
यासाठी वापरता येईल. (वरील यादीमध्ये
शासनाच्या मान्यतेने अधिक वापराचा समावेश करता येईल.)
किंवा
(ब) दुकानांचा वापर फक्त तळमजल्यापुरता मर्यादित ठेवून
उर्वरित मजल्यावर शिल्लक चटई क्षेत्र निर्देशांक वापरुन रहिवास अथवा वरील क्र.2(अ)
मध्ये नमूद वापर अनुज्ञेय राहतील.
******
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा