शुक्रवार, १२ जुलै, २०१३

अभिनयाच्या साम्राज्यातील ‘शेरखान’ हरपला
अभिनेते प्राण यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
मुंबई, दि. 12 : आपल्या सहज आणि जिवंत अभिनयाने चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते प्राण यांच्या निधनाने अभिनयाच्या साम्राज्यातील ‘शेरखान’ हरपला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्व. प्राण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.  
        आपल्या शोकसंदेशात श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे की, गेली सहा दशके आपल्या विविधांगी अभिनयाने रसिकांना जिंकणारे प्राण यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने उचित सन्मान करण्यात आला होता. अगदी अलिकडेपर्यंत म्हणजे 2007 पर्यंत ते कार्यरत होते.
 मुख्यत्वे खलनायकी भुमिका करणाऱ्या प्राण यांनी ‘जंजीर’ चित्रपटात केलेली दिलदार ‘शेरखान’ची अजरामर भुमिका आजही रसिकांच्या मनात घर करुन आहे. बॉलिवुडमध्ये प्राण यांना अत्यंत आदराचे स्थान होते. जिस देशमे गंगा बहती है, जॉनी मेरा नाम, उपकार, बॉबी या चित्रपटात त्यांनी केलेल्या भुमिका रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहणाऱ्या आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील हा ‘लव्हेबल व्हिलन’ चित्रपट रसिक कधीही विसरणार नाहीत.
0000000
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा