अंगणवाडीतल्या 12 बालकांवर
मुंबईत मोफत हृदय शस्त्रक्रिया
मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस
मुंबई, दि. 11 : सातारा
जिल्ह्यातील 0 ते 6 वयोगटातील बालकांवर येथील जसलोक रुग्णालय, कोकीळाबेन धीरूबाई
अंबानी हॉस्पीटल ॲण्ड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि बॉम्बे हॉस्पीटलमध्ये मोफत हृदय
शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जसलोक
हॉस्पीटलला भेट देऊन शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या बालकांच्या प्रकृतीची विचारपूस
केली.
आज
सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी जसलोक हॉस्पीटलला भेट देऊन बालकांवर करण्यात आलेल्या
उपचाराबाबत हॉस्पिटलचे हृदय शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. सुरेश जोशी यांच्याकडून माहिती
जाणून घेतली. यावेळी जसलोक रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर.आर.पुलगावकर,
धर्मादाय आयुक्त विश्वासराव जाधव आणि सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी अभिजित बांगर तसेच हॉस्पिटलचे इतर डॉक्टर उपस्थित होते.
सातारा
जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियमित आरोग्य तपासणीत 98 मुलांची हृदय विकाराशी
संबंधित चाचणी केली होती. त्यांची 2 डी ईको चाचणी देखील करण्यात
आली होती. त्यातील 18 मुलांवर तातडीने हृदय
शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. त्यांची आर्थिक परिस्थिती पाहता
धर्मादाय आयुक्त कार्यालयाने पुढाकार घेऊन मुंबईतल्या रुग्णालयांमधून या गरीब मुलांच्या
मोफत शस्त्रक्रियेची सोय केली. आणि पहिल्या टप्यात 12
मुलांवर शस्त्रक्रिया पार पडल्या.
शस्त्रक्रिया
करण्यात आलेल्या बालकांची मुख्यमंत्र्यांनी आस्थेने विचारपूस करीत लवकर बरे
होण्याच्या शुभेच्छाही दिल्या. यावेळी शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या बालकांच्या
पालकांचीही त्यांनी विचारपूस करून त्यांना दिलासा दिला.
जसलोक
हॉस्पीटलमध्ये अनुष्का संभाजी यादव (कासार शिरंबे), निलेश अशोक गायकवाड (कोंडवे),
वेदांत गणेश भिलारे (भिलारवाडी), अथर्व तानाजी पवार (सस्तेवाडी) या बालकांवर
शस्त्रक्रिया करण्यात आली आहे तर कोकीळाबेन धीरूबाई अंबानी हॉस्पीटल ॲण्ड मेडिकल
रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये प्रेरणा कृष्णा मंडलकर (काळज), प्रांजल नागेश अडागळे
(बुध), शिवानी सतिश गायकवाड (नांदगाव), सिद्धी नितीन देशमुख (कुकुडवाड), बॉम्बे
हॉस्पीटलमध्ये शिवराज शंकर चौधरी (कारवे), शुभम संतोष पाटील (कासार शिरंबे),
श्रेयस सखाराम फडतरे (फडतरवाडी (बुध)), प्रणव नितीन यादव (जायगाव) या बालकांवर
हृदय शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.
0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा