गुरुवार, ११ जुलै, २०१३

रमजानचा महिना सहजीवनाची
शिकवण देणारा : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्व मुस्लिम धर्मियांना रमजानच्या पवित्र महिन्याबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
आपल्या शुभेच्छा संदेशात श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे की, संपूर्ण जगाला शांतीची, एकेश्वरवादाची आणि सहजीवनाची शिकवण देणारा रमजान महिना इस्लाम धर्मियांमध्ये आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो. इस्लामी चांद्र दिनदर्शिकेतील हा नववा महिना मानवाने कळत नकळतपणे केलेल्या वाईट कृत्यांबद्दल पश्चात्ताप व्यक्त करुन आध्यात्मिक विचार करण्यासाठी प्रवृत्त करणारा असतो. केलेल्या चुकीच्या गोष्टीचा जाणीवपूर्वक स्वीकार करुन त्याबद्दल आत्मचिंतन करण्याची शिकवण देणारा हा अतिशय महत्वाचा महिना आहे.
या महिन्यात मुस्लिम बांधव संपूर्ण दिवस उपवास करुन आपला वेळ नेमून दिलेले कर्तव्य पार पाडीत असताना ईश्वरचिंतनात घालवितात. संपुर्ण महिनाभर अशा प्रकारे उपवास, ईश्वराची प्रार्थना यामध्ये व्यतीत केल्यावर प्रत्येकाला उर्वरित आयुष्य नेकीने आणि परोपकाराच्या भावनेतून जगण्याची शिकवण मिळते. महिन्याच्या शेवटी चंद्रकोरीचे दर्शन झाल्यावर ईद-ऊल-फित्र साजरा केला जातो. अशा सामुहिक उपवासामुळे संपूर्ण समाजात एकोप्याचा भावना वाढण्यास मदत होते. म्हणूनच हा सण सामाजिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा आहे, असे श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.

00000000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा