शुक्रवार, ७ जून, २०१३


माझे सैनिक, माझा लढा आत्मचरित्राने
मराठी साहित्य विश्वाचे दालन समृद्ध - मुख्यमंत्री
            पुणे, दि. 7 : माजी लष्करप्रमुख जे.जे. सिंग यांच्यामाझे सैनिक, माझा लढा या आत्मचरित्रामुळे मराठी साहित्य विश्वाचे दालन समृद्ध झाले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
        लष्करप्रमुख सिंग यांच्या सोल्जर्स जनरल या इंग्रजी आत्मचरित्राचे माझेसैनिक, माझा लढाया नावाने मराठीत भाषांतर करण्यात आले आहे. डॉ. विजया देव यांनी मराठी अनुवादीत केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते क्रॉसवर्ल्ड येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, आमदार चरणजितसिंग सप्रा, आमदार शरद रणपिसे, एनडीएचे कमांडट एअर मार्शल के.एस.गिल, जिल्हाधिकारी विकास देशमुख, पोल आयुक्त गुलाबराव पोळ अमेय प्रकाशनचे उल्हास लाटकर आदी उपस्थित होते.
        मुख्यमंत्री म्हणाले, जे.जे. सिंग यांच्या माझे सैनिक, माझा लढा या आत्मचरित्रामुळे मराठी वाचकांना भारतीय लष्करांबाबत अतिशय महत्वपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. त्यांनी उमेदीच्या काळापासून ते लष्करप्रमुख होईपर्यंतचा जीवनपट आत्मचरित्राच्या माध्यमातून वाचकांसमोर मांडला आहे. त्यांच्या चरित्राबरोबरच भारतीय लष्करातील परंपरा पध्दती आणि देशाच्या संरक्षणाप्रती असलेली लष्कराची बांधिलकी याचा परिचय या पुस्तकातून वाचकांना होतो. मराठी अनुवाद करताना भाषेच सौंदर्यही डॉ. विजया देव यांनी जपले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
        यावेळी डॉ, विजया देव यांनी मूळ इंग्रजी चरित्राचा अनुवाद करताना आलेल्या अनुभवाचे कथन केले. उल्हास लाटकर यांनी प्रास्ताविक केले.
0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा