कातरखटावच्या
सिमेंट बंधाऱ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जलपुजन
पाण्याने तुडुंब भरलेल्या बंधाऱ्यात मुख्यमंत्र्यांचे बोटींग
सातारा,
दि.9
:- ज्या दुष्काळी भागात दोन-चार दिवसापुर्वी लोक पाणी पाणी करत होते;
त्याच परिसरात राज्य शासनाने घेतलेल्या सिमेंट बंधाऱ्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने चांगला पाणीसाठा झाल्याने हे बंधारे तुडुंब भरले असून आज या बंधाऱ्यातील पाण्याचे राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जलपुजन करुन बोटींग केले. दुष्काळी भागात तलावात साठलेल्या पाण्यात मुख्यमंत्र्यांनी केलेले बोटींग हा एक औत्सुक्याचा आणि दुष्काळी जनतेच्या चेहऱ्यावर आनंद पसरविणारा क्षण ठरला.
राज्य
शासनाने दुष्काळ निर्मुलनासाठी राज्यातील दुष्काळ व पाणीटंचाई कायमस्वरुपी मात करण्यासाठी 6
जिल्हयांतील 15
तालुक्यातील 474
गावात बांधलेल्या 1
हजार 423
सिमेंट नालाबांध बंधा-याचे राज्यस्तरीय लोकार्पणाचा शुभारंभ गोंदवले येथे केल्यानंतर खटाव तालुक्यातील कातरखटाव येथे पावसाने भरलेल्या साखळी बंधाऱ्यांची पाहणी आणि जलपुजन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज संपन्न झाले. त्यांच्या समवेत जलसंधारण मंत्री डॉ. नितीन राऊत,
गृहराज्यमंत्री सतेज पाटील,
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील,
आमदार जयकुमार गोरे, जलसंधारणाचे प्रधान सचिव व्हि. गिरीराज,
मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव आशिषकुमार सिंग,
जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन.,
कोल्हापूरचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. एन. टी. शिसोदे,
प्रसिद्ध जलतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा आदी मान्यवर उपस्थित होते.
कातरखटाव
ओढ्यावर कृषी विभागाच्या माध्यमातून चार साखळी सिमेंट बंधारे बांधण्याबरोबरच ओढा सरळीकरण,
खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले असून जवळपास 900
मिटर लांबीचा जलाशय निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यापासून पडत असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे या ओढ्यावरील बंधाऱ्यांमध्ये मोठा पाणीसाठा झाला असून चारही बंधारे पाण्याने तुडुंब भरले आहेत. कातरखटाव येथे जवळपास 8
बंधारे बांधण्यात आले असून यामुळे 117
टीसीएम पाणीसाठा झाला आहे. या बंधाऱ्यामुळे परिसरात भुगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास निश्चितपणे मदत होईल असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्यातील
दुष्काळाला शासनाने समर्थपणे तोंड दिले असून यासाठी मोठी शासकीय यंत्रणा दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभी केली असल्याचे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,
आज महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात सिमेंट साखळी बंधाऱ्यांचे लोकार्पण होत असून ही इतिहासातील आगळीवेगळी घटना आहे. राज्यातील जनतेला दुष्काळाचा सामना पुन्हा करावा लागू नये यासाठी शासनाने जलसिंचन आणि जलसंधारणातून दुष्काळमुक्त राज्य करण्याचा निर्धार केला आहे. राज्यात सिमेंट बंधाऱ्यांचा 800
कोटींचा कार्यक्रम योजना आयोगाच्या मदतीने राज्य शासन राबवित असल्याचे ते म्हणाले. याद्वारे विकेंद्रीत पाणीसाठा करुन टंचाईवर मात करण्यात प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
खटाव
तालुक्यात कृषी विभागाच्या माध्यमातून 106
सिमेंट बंधारे घेतले असून यापैकी 65
बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा झाला आहे. यामुळे परिसरातील विहिरी आणि बोअरच्या पाणी पातळीत वाढ होणार असून या परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आज आनंद दिसून येत असून सर्व शेतकऱ्यांची पाण्याची इच्छा नजिकच्या काळात पूर्ण होईल,
अशी आशाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
मान्सूनपूर्व पावसाने कातरखटाव येथील तुडुंब भरलेल्या बंधाऱ्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अन्य मान्यवरांनी बोटींग केल्याने हा आगळा वेगळा क्षण येथील जनतेच्या सदैव स्मरणात राहील,
अशी चर्चा यावेळी उपस्थितामध्ये व्यक्त होत होती. हा बोटींगचा क्षण पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी एकच गर्दी केली होती
प्रारंभी
जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी खटाव तालुकासह जिल्ह्यात राबविलेल्या साखळी सिमेंट बंधाऱ्यांची माहिती दिली. कातरखटाव येथे कृषी विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या साखळी सिमेंट बंधाऱ्यांची माहिती सहसंचालक नारायण शिसोदे व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रतापसिंह कदम यांनी मुख्यमंत्री महोदय आणि अन्य मान्यवरांना दिली. या समारंभास निवासी उपजिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर,
उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे,
संजीव देशमुख,
प्रांताधिकारी धनाजी पाटील,
तहसीलदार वैशाली राजमाने यांच्यासह अनेक मान्यवर,
पदाधिकारी,
नागरिक उपस्थित होते.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा