सोमवार, ६ मे, २०१३


मंत्रालयीन लोकशाही दिनी
 आठ अर्जांवर सुनावणी
मुंबई, दि. 6 : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या मंत्रालयीन लोकशाही दिनी आठ अर्जांवर सुनावणी करण्यात आली.
यामध्ये महसूल, गृह, नियोजन विभागांशी संबंधीत प्रत्येकी एक अर्ज, नगर विकास संदर्भात दोन तर ग्रामविकास विभागाशी संबंधित तीन अर्ज अशा एकूण आठर्जावर सुनावणी करण्यात आली. सर्व अर्जदारांच्या तक्रारी ऐकून घेऊन तक्रार दारांच्या अर्जावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी अशा सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी दिल्या.
याप्रसंगी मुख्य सचिव जयंतकुमार बाँठिया, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव ए.के.जैन, महसूल विभागाचे अपरमुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एस.एस. संधू, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह, पोलीस महासंचालक संजीव दयाळ, माहिती व जनसंपर्क महासंचालनायलयाचे सचिव प्रमोद नलावडे यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा