गुरुवार, ११ एप्रिल, २०१३


श्री साईनिवास धर्मशाळा आंध्रप्रदेश महाराष्ट्राच्या बंधूभावाचे प्रतिक
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

      शिर्डी दि.11- श्री साईनिवास धर्मशाळा ही आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्राच्या बंधूभावाचे प्रतिक आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे श्री साईनिवास धर्मशाळेच्या उद्रघाटन प्रसंगी बोलतांना केले. यावेळी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री बबनराव पाचपुते, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, केंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री सर्वेय सत्यनारायण, आंध्रप्रदेशचे मंत्री श्री रामचंद्रा, खा. हनुमंतराव, आंध्रचे आमदार सर्वश्री .डी सुधीर रेडडी, किसन रेडडी, खा. भाऊसाहेब वाकचौरे, आंध्रचे माजी खा. प्रभाकर रेडडी, नगराध्यक्षा सुमित्रा कोते, आदि मान्यवर उपस्थित होते.
      मुख्यमंत्री पुढे बोलतांना म्हणाले की, शिर्डी हे अत्यंत महत्वाचे तिर्थक्षेत्र असल्याने अशी आणखी एक इमारत उभारवयाची असल्यास आपण संपूर्ण मदत करु. शिर्डी मध्ये सर्व जातीधर्माचे लोक मोठया संख्येने येत असतात त्यामुळे अशा इमारतीचे उद्रघाटन होणे खरोखरच आनंदाची बाब आहे. गुढीपाडवा आणि महात्माफुले यांची जयंती आज असल्याने आजचा दिवस चांगला आहे. खा. हनुमंतराव यांच्या प्रयत्नाने ही इमारत ख-या अर्थाने यशस्वी झाली असे सांगून त्यांनी गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
      आंध्रप्रदेशचे आमदार भाषणात म्हणाले की, ज्याप्रमाणे महाराष्ट्रात आज नववर्ष साजरे केले जात आहे. त्याप्रमाणे आंध्रात देखील हा सण मोठया उत्साहात साजरा केला जातो. आणि या दिवसी श्री साई निवास धर्मशाळेचे उद्रघाटन होणे ही आनंदाची बाब आहे.
      पालकमंत्री बबनराव पाचपुते म्हणाले की, शिर्डीचे साईबाबा हे मोठे आहेत. आणि अशा पवित्र  शिर्डीत सुसज्ज इमारत होणे भाग्याचे आहे. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील नववर्षाचे शुभेच्छा दिल्या. लाखो लोक शिर्डी येथे भेट देत असतात. त्यामुळै शिर्डीला  खुप महत्व आहे. आणि अशा पवित्र नगरीत सर्वसोयीयुक्त साईनिवास धर्मशाळेचे उद्रघाटन आनंदाची बाब आहे. असे ते म्हणाले यावेळी आंध्रप्रदेशचे मंत्री श्री रामचंद्रन केंद्रीय राज्यमंत्री सर्वेय सत्यनारायण यांची देखील समयोचीत भाषणे झाली.
      श्री साईनिवास धर्मशाळेत स्पेशल एसी, डिलक्स एसी, डिलक्स नॉन एसी, व इतर अशा एकुण 156 रुम अडीच हजार रुपये या दराने उपलब्ध होणार आहे.
      या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

0000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा