गुरुवार, ११ एप्रिल, २०१३

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी
शिर्डी येथील श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले
       शिर्डी दि.11- राज्याचे मुख्यमंत्री श्री.पृथ्वीराज चव्हाण यांनी आज गुढी पाडव्याच्या शुभमुहुर्तावर शिर्डी येथील श्री साईबाबांच्या मंदिरात श्री. साईबाबांच्या समाधीचे भक्तीभावाने दर्शन घेतले.
      यावेळी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री बबनराव पाचपुते, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी जि.प.अध्यक्षा शालिनीताई विखे, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, आ.जयंत ससाणे, विभागीय आयुक्त रविंद्र जाधव, श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश जयंत कुलकर्णी, जिल्हाधिकारी डॉ.संजीव कुमार, मुख्याधिकारी रुबल आग्रवाल, संस्थानचे कार्यकारी अधिकारी किशोर मोरे, पोलिस अधिक्षक शिंदे, नगराध्यक्षा सुमित्रा कोते आदि मान्यवर उपस्थित होते.
      श्री साईबाबा संस्थानच्या वतीने जयंत कुलकर्णी यांनी यावेळी मुख्यमंत्री महोदयांचा वस्त्र, साईमुर्ती व श्रीफळ देऊन सत्कार केला.


00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा