गडचिरोली नक्षल-पोलीस चकमकीत ठार झालेल्या गावकऱ्यांच्या
कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपये --- मुख्यमंत्र्यांची
घोषणा
मुंबई, दि. १३ :
गडचिरोलीतील धानोरा तालुक्यामधल्या सिंदसूर गावाजवळच्या जंगलात काल नक्षलवाद्यांशी
पोलिसांच्या झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दोन ग्रामस्थांच्या कुटुंबियांना
प्रत्येकी १० लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज
केली आहे.
शुक्रवारी दुपारी झालेल्या या चकमकीत पोलीस दलाचाही एक जवान
शहीद झाला. या वेळी पोलिसांच्या गोळीबारात सुखदेव वारलू गावडे व कालिदास गुरकाई हिडको
हे दोन आदिवासी तरुण ठार झाले. त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री निधीतून
प्रत्येकी ३.५ लाख तर केंद्राच्या निधीतून ६.५ लाख रुपये असे एकूण १० लाख रुपये
प्रत्येकी देण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी आज जाहीर केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा