ज्येष्ठ अभिनेते प्राण यांना
दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्धल
मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
मुंबई दि १३ भारतीय चित्रपटसृष्टीच्या
शताब्दीपूर्तीच्या वर्षात दादासाहेब फाळके
पुरस्कार श्री प्राण यांना मिळणे हा आनंदाचा योग असून आपल्या नैसर्गिक अभिनयाने
कोणत्याही भूमिकेत सहज रंग भरणाऱ्या या ज्येष्ठ कलाकाराचे आपण मन:पूर्वक अभिनंदन
करतो असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
चित्रपटसृष्टीतला सर्वात
मानाचा असा दादासाहेब फाळके पुरस्कार प्राण यांना जाहीर झाला, त्यावेळी
प्रतिक्रिया देतांना मुख्यमंत्री म्हणाले की,
कोणत्याही भूमिकेत चपखल बसणाऱ्या प्राण यांनी आपल्या
दमदार अभिनयाने रसिकांच्या मनावर अक्षरश; मोहिनी टाकली होती. खलनायक असो
किंवा चरित्र नायक, प्राण यांचे पडद्यावरील दर्शन चित्ररसिकांना हवेहवेसे असे.
केवळ अभिनय करून ते थांबले नाहीत तर, पडद्याबाहेरच्या जगातही त्यांनी सामाजिक
जाणीवेतून जे काम केले त्यामुळे त्यांच्या विषयीचा आदर आणखी दुणावल्याशिवाय राहणार
नाही . प्राण यांच्या अभिनयाचा अभ्यास नव्या पिढीतल्या कलाकारांनी करण्यासारखा
आहे.
एका सच्छिल आणि आदरणीय अशा
व्यक्तिमत्वाला मिळालेला हा पुरस्कार अगदी योग्यच आहे अशी आपली भावना असल्याचे
देखील मुख्यमंत्री म्हणतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा